वडीलांच्या पुण्यस्मरणानिमित्त नगरसेवकाने रस्त्यावर बसवला वॉटर कुलर

राजेंद्र बच्छाव
शनिवार, 24 मार्च 2018

इंदिरानगर (नाशिक) : येथील प्रभाग क्रमांक 30 चे भाजप नगरसेवक अॅड.श्याम बडोदे यांनी वडील कै. धर्मराज पापालाल बडोदे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजीत सर्व धार्मिक विधींना फाटा देत सुमारे 50 हजार रुपये खर्च करत त्यांच्या स्मरणार्थ वॉटर कुलर (पाणपोई) बसवत आपले वेगळेेपण दाखवले आहे. या कूलरचे लोकार्पण  इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या हस्ते करण्यात आले.

नगरसेवक सतिष सोनवणे, सुप्रिया खोडे, माजी नगरसेवक सुनील खोडे, सचिन कुलकर्णी, प्रमुख पाहुणे होते. जमनाबाई बडोदे आणि शितल बडोदे यांनी प्रतिमापूजन केले. अॅड. बडोदे म्हणले की, सर्व कुटुंबीयांनी निर्णय मान्य केल्याने हे शक्य झाले आहे. सायंकाळी मोठ्या संखेने येथून फेरफटका मरणाऱ्या परंतु पथ्यपाणी असलेल्या जेष्ठ नागरीकांची या निमित्ताने कायमस्वरूपी शुद्ध पाण्याची सोय केल्याचे मोठे समाधान आहे. यावेळी माला पारवे, उदय बडोदे, रामभाऊ बडोदे, मनीष पाटील, जयवंत टक्के, आशिष दाभोलकर, निलेश साळुंके, मनोज वायल, आदिल शेख, नितीन बांडे, अजय बडोदे, विशाल बडोदे, मनोज दिवटे, योगेश रेवगडे, नितीन मेमाने आदिंसह जेष्ठ नागरीक उपस्थित होते.

Web Title: corporator starts water cooler on road on the occasion of death anniversary of father