नगरसेविका सुमन ओहोळ, शेख रशिदा, संदीप गुळवे शिवबंधनात 

shivsena
shivsena

नाशिक - वर्षभरापासून शिवसेनेत प्रवेश देण्याचा सिलसिला या वर्षाच्या प्रारंभी कायम राहिला आहे. शिवसेनेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सुमन ओहोळ यांच्यासह त्यांचे पती माजी नगरसेवक विजय ओहोळ, अपक्ष नगरसेविका शेख रशिदा यांना प्रवेश देण्यात आला. ग्रामीण भागाकडेही लक्ष केंद्रित करताना कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे यांनीही आज मातोश्रीवर शिवबंधन बांधले. 

ओहोळ दांपत्याच्या प्रवेशामुळे प्रभाग सोळामध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे. रशिदा शेख ज्या भागातून नेतृत्व करतात, तो मुस्लिमबहुल भाग असल्याने प्रभाग 23 मधील त्या मतांवर डोळा ठेवून प्रवेश झाला. अन्य प्रवेशांमध्ये कॉंग्रेसचे माजी नगरसेवक त्र्यंबकराव गायकवाड यांचे पुत्र श्रीराम गायकवाड यांचा महत्त्वाचा समावेश आहे. भाजपने यापूर्वी मनसेच्या नगरसेविका संगीता गायकवाड व हेमंत गायकवाड यांना प्रवेश दिला होता. त्यांना टक्कर देण्यासाठी गायकवाड कुटुंबातूनच पर्याय उभा करून शिवसेनेने भाजपसमोर आव्हान निर्माण केले आहे. प्रभाग 15 मध्ये ओबीसी मतांचे राजकारण जुळवून आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रशांत रकटे यांचा प्रवेश झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेशात खरेदी-विक्री संघाचे ज्ञानेश्‍वर लहाने, आनंद सहाणे, "राष्ट्रवादी'चे उपशहरप्रमुख विशाल पवार, संदीप पवार, शांताराम कुटे, विक्रम कोठुळे, दशरथ माने यांचा समावेश आहे. पक्षप्रवेशावेळी संपर्कप्रमुख अजय चौधरी, खासदार अरविंद सावंत, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, ऍड. शिवाजी सहाणे, नगरसेवक विलास शिंदे आदी उपस्थित होते. 

आजी-माजी नगरसेवक सेनेत 
दोन वर्षांत शिवसेनेत झालेले प्रवेश असे ः प्रारंभी खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर गणेश चव्हाण, मीना माळोदे, डॉ. विशाल घोलप, माजी महापौर ऍड. यतीन वाघ, सुरेखा नागरे, उषा शेळके, अशोक सातभाई, ऍड. अरविंद शेळके, शीतल भामरे, रत्नमाला राणे, सुवर्णा मटाले, रमेश धोंगडे यांनी टप्प्याटप्याने प्रवेश केला. त्यापूर्वी नगरसेवकपद रद्द ठरविलेल्या शोभना शिंदे व नीलेश शेलार यांनी महापौर निवडणुकीच्या काळात शिवसेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार पाडताना शिवाजी चुंभळे, कल्पना चुंभळे, विनायक खैरे व रंजना बोराडे यांचा प्रवेश घडवून आणला. माजी नगरसेवक प्रकाश बोराडे व ऍड. सुनील बोराडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com