PHOTO : महापौर निवडणुकीच्या धामधुमीत नगरसेवकांची टूर..गुलाबी थंडीत झक्कास पर्यटन! 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

नगरसेवक म्हटला की रोज सकाळपासून सायंकाळपर्यंत लोकांच्या सेवेसाठी वेळ देतात. मतदार नाराज होऊ नये, तर कधी आपण ज्या कारणासाठी निवडून आलो, त्याप्रति ऋणी राहण्याचा भाव असतो. काहींना नगरसेवक उपलब्ध होत नसल्याचा अनुभव येतो. काहींना तत्काळ सेवा मिळण्याचादेखील अनुभव येतो. महापालिकेची महासभा किंवा पक्षाचा एखादा कार्यक्रम एवढ्यापुरतेच नगरसेवक एकत्र येतात. त्याव्यतिरिक्त प्रत्येकाची सुख-दुःखे जाणून घेण्याची संधी क्वचितच मिळते. महापालिकेचे सर्वच नगरसेवक त्याला अपवाद ठरले.

नाशिक : येत्या शुक्रवारी (ता. 22) महापौरपदाची निवडणूक होत आहे. नगरसेवकफुटीच्या भीतीने सर्वच पक्षांनी नगरसेवकांना सहलीसाठी पाठविले आहे. नगरसेवकफुटीचे कारण असले तरी या निमित्ताने प्रत्येक पक्षातील सर्वच नगरसेवक कुटुंबासह एकत्र आले आहेत. मिळालेल्या संधीचा आनंद भाजपसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक घेत आहेत. एक दिवस पुणे, दुसऱ्या दिवशी कोकणातील देवगड व आता गोव्यात मुक्कामाला असलेल्या भाजप नगरसेवकांकडून राजकीय सुटीचा पुरेपूर आनंद घेतला जात आहे. 

Image may contain: 3 people, people smiling, people standing and outdoor

PHOTO - गोवा येथे सहलीला गेलेल्या भाजप नगरसेवक. 

नगरसेवकांकडून राजकीय सुटीचा पुरेपूर आनंद

नगरसेवक म्हटला की रोज सकाळपासून सायंकाळपर्यंत लोकांच्या सेवेसाठी वेळ देतात. मतदार नाराज होऊ नये, तर कधी आपण ज्या कारणासाठी निवडून आलो, त्याप्रति ऋणी राहण्याचा भाव असतो. काहींना नगरसेवक उपलब्ध होत नसल्याचा अनुभव येतो. काहींना तत्काळ सेवा मिळण्याचादेखील अनुभव येतो. महापालिकेची महासभा किंवा पक्षाचा एखादा कार्यक्रम एवढ्यापुरतेच नगरसेवक एकत्र येतात. त्याव्यतिरिक्त प्रत्येकाची सुख-दुःखे जाणून घेण्याची संधी क्वचितच मिळते. महापालिकेचे सर्वच नगरसेवक त्याला अपवाद ठरले.

Image may contain: one or more people, people standing, outdoor and nature

PHOTO गोवा येथे सहलीसाठी गेलेल्या भाजपच्या जेष्ठ नगरसेविकांना परदेशी पाहुण्यांसोबत केलेले फोटो सेशन.

गोव्याच्या बागा, बीचवर मंगळवारी भाजपच्या काही नगरसेवकांनी आनंद घेतला. नगरसेविकांनी फोटोसेशनमध्ये धन्यता मानली. ज्येष्ठ नगरसेवकांनी परदेशी पाहुण्यांसोबत फोटोसेशन करत आनंद लुटला. शिवसेनेचे नगरसेवक मुंबईतील आलिशान हॉटेल रिट्रीटमध्ये आनंद घेत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक लोणावळ्यातील निसर्गाचा आनंद लुटत आहेत. कॉंग्रेसचे नगरसेवक इगतपुरी तालुक्‍यात बोचरी थंडी अनुभवत आहेत. 
Image may contain: one or more people, people standing and outdoor
 
 PHOTO -गोवा येथील बागा बीच समोरील नाजीर रिसोर्ट मध्ये एन्जॉय मुड मध्ये असलेले नगरसेवक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporator Tour in Goa Nashik News Marathi News