वाहनांना अडवून पैसे उकळणारा पोलीस निलंबित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

नाशिक : ओझर पोलीस ठाण्यामध्ये नियुक्तीला असताना, पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गावर जाऊन वाहनांची अडवून केली व वाहनचालकांकडून पैसे घेतल्याप्रकरणी पोलीस हवालदार संजय मुरलीधर शिंदे यास निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी सदरचे आदेश दिले आहेत. 

पोलीस हवालदार संजय शिंदे याची ओझर पोलीस ठाण्यात वाहतूक पोलीस शाखेत नियुक्तीला असताना, गेल्या सोमवारी (ता.9) त्याची सायखेडा फाटा येथे कर्तव्यावर नेमले होते. परंतु संजय शिंदे याने सदरील नेमणुकीचे ठिकाण सोडून मुंबई आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाटा येथे वाहनांची अडवून केली. सदरचे ठिकाण हे पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून याठिकाणी वाहनांची अडवून करून शासकीय पावती पुस्तक नसताना, वाहनचालकांकडून पैशाची मागणी करीत ते स्वीकारले. या घटनेचे काही वाहनचालकाने मोबाईलमध्ये चित्रण केले होते. ते चित्रण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याच्या कृत्याची पोलखोल झाली. 

सदरची घटनेची नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी तात्काळ चौकशी करून पोलीस दलाची प्रतिमा मलिन व अशोभनीय कृत्य केल्याचा ठपका ठेवत आज हवालदार संजय शिंदे यास निलंबित करण्याचे आदेश बजावले. निलंबन काळामध्ये संजय शिंदे हे आडगाव येथील ग्रामीण मुख्यालयात राहतील. राखीव पोलीस निरीक्षकाकडे त्यांनी दिवसातून दोन वेळा हजेरी द्यायची आहे. तसेच, मुख्यालयाच्या उपअधीक्षकांच्या परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचेही आदेश दिले आहेत. अन्यथा शिस्तभंगांची कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Corrupt police officer suspended in Nashik