माळमाथा परिसरात कापूस लागवडीला वेग (व्हिडिओ)

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 25 मे 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरात सद्या कापूस लागवडीच्या कामाला वेग आला असून, मजुरांनाही त्यानिमित्ताने रोजगार मिळत आहे. ज्यांच्या विहिरीला व कुपनलिकेला पाणी आहे असे सर्व छोटे-मोठे बागायतदार शेतकरी हल्ली शेतात कापसाच्या विविध वाणांची लागवड करण्यात मग्न आहेत. काही शेतकऱ्यांची कापूस लागवड याआधीच पूर्ण झाली आहे. प्रत्येक महिला मजूरास दिवसाला किमान दीडशे ते दोनशे रुपये मजुरी दिली जाते. प्रत्येक मजूर दिवसाला किमान एका कापसाच्या डब्ब्याची लागवड करतात.

दीडशे ते दोनशे रुपये मजुरी...
सद्या कापूस लागवडीसाठी मजुरांना दीडशे ते दोनशे रुपये रोज दिला जातो. उन्हाच्या तीव्रतेमुळे कामाची वेळ सकाळी सहा ते दुपारी बारापर्यंत असते. त्यातही मजुराला प्रत्येकी एक-एक डब्याचे टार्गेट दिल्यामुळे काम पूर्ण झाल्यास दहा-अकरा वाजेपर्यंतही सुटी दिली जाते. कापूस लागवडीच्या कामामुळे हजारो मजुरांना रोजगारही मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत कापूस लागवडीचा शेतकरी बांधवांचा प्रयत्न असतो. 'वन-वे' व 'टू-वे' अशा दोन पध्दतींनी कापसाची लागवड केली जाते.

विहिरी व कुपनलिकांच्या पाणीपातळीत घट...
कडक उन्हाळ्यामुळे विहिरी व कुपनलिकांच्या पाणीपातळीत प्रचंड घट झाली असून बळीराजा विहिरींच्या खोलीकरणास प्राधान्य देत आहे. तर काही शेतकरी नवीन विहिरी व बोअरवेल करण्यात व्यस्त आहेत. काही शेतकऱ्यांच्या नवीन विहिरीला व बोअरला पाणी न लागल्याने हजारो रुपये खर्च वाया गेला. तरीही नाउमेद न होता ते वरुण राजाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर कोरडवाहू शेतकरीही कापूस लागवडीचा यशस्वी प्रयोग करतात.

भारनियमनाचा फटका...
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विजभारनियमनामुळे मोठा फटका बसतो. उन्हाच्या तीव्रतेमुळे पिके कोमेजू नयेत म्हणून शेतकरी राजा सलग पाणी घालून पिके जगवण्यासाठी धडपड करतो. परंतु, वीज भारनियमनामुळे त्याला रात्रपहाट एक करून पिकांना पाणी द्यावे लागते. वीज भारनियमनाचा कालावधी कमी करावा, अशी मागणीही परिसरातील शेतकरी बांधवानी केली आहे.

Web Title: Cotton planting fields is malmatha area in dhule district