जळगाव - कापसाच्या दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. कापसाला आठ दिवसांपूर्वी क्विंटलला 5 हजार 600 रुपये भाव होता. तो आता 5 हजार 400 रुपयांवर आला आहे. फेब्रुवारी महिना निम्म्यावर आला, तरी अद्यापही शेतकरी कापसाला अधिक भाव मिळेल, अशी आशा बाळगून आहेत.
यंदा पाऊस कमी झाल्याने खरिपाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्यांची घट झाली आहे. भाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी बाजारात कापूस आणणे बंद केल्याने यंदा जिनिंग-प्रेसिंग उद्योग संकटात आहे. कापूस उपलब्ध होत नसल्याने गाठीची निर्मिती होत नाही. यामुळे 80 टक्के उद्योग बंद आहेत.