Cotton Rate News : अनधिकृत विनापरवाना कापूस बियाण्याची विक्री; भरारी पथकाचा छापा; गुन्हा दाखल | Cotton Rate News Unauthorized sale of unlicensed cotton seed Raid by Bharari Squad Filed case Dhule News | Kapus Bajarbhav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton Rate News

Cotton Rate News : अनधिकृत विनापरवाना कापूस बियाण्याची विक्री; भरारी पथकाचा छापा; गुन्हा दाखल

Dhule News : देऊर (बुद्रुक) येथे विनापरवाना एचटीबीटी कपाशीचे बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एकाच्या दुकानावर धुळे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून संशयित बियाणे जप्त केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

देऊर येथील निखिल दीपक ठाकरे विनापरवाना अनधिकृतपणे व छुप्या पद्धतीने कपाशी बियाणे विक्री करीत असल्याची माहिती पंचायत समितीच्या कृषी अधिकारी व बियाणे निरीक्षकांना मिळाली. (Cotton Rate News Unauthorized sale of unlicensed cotton seed Raid by Bharari Squad Filed case Dhule News)

नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, कृषी विकास अधिकारी यू. टी. गिरासे, मोहीम अधिकारी प्रदीप निकम यांचे मार्गदर्शन व आदेशाने साक्री पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश महादेव नेतनराव, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक प्रमोद ईशी व ज्ञानेश्वर गिरासे यांनी निखिल ठाकरे यांच्या घराची तपासणी केली असता घरात संशयित, अनधिकृत सुमारे चार हजार ५०० रुपये किमतीचे एचटीवीटी कपाशी बियाणे भगवती ५५५ आढळून आले.

ते जप्त करण्यात आले असून, चोपडा येथील भगवती सीड्सचे दिलीप शिंदे यांच्याकडून खरेदी केल्याचा लेखी जबाब पंचासमक्ष नोंदविला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार बी-बियाणे निरीक्षक आर. एस. चौधरी यांनी निखिल ठाकरे (रा. देऊर बुद्रुक) व चोपडा येथील दिलीप शिंदे (रा. चोपडा) तसेच अनधिकृत कपाशी बियाणे उत्पादक कंपनी यांच्याविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Marathi Tajya Batmya)

"शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक बियाणे विक्री केंद्रातूनच व बियाणे खरेदीचे रीतसर खरेदीचे बिल घेऊनच बियाणे खरेदी करावी. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. त्यामुळे कोणाचीही फसवणूक होणार नाही."

-मोहन वाघ, कृषी विभाग, सहसंचालक, नाशिक