न्यायालयातील लिपिकाला 50 रुपये लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

धुळे  - नामंजूर जामीन अर्जाची व आदेशाची प्रमाणित प्रत मिळण्यासाठी तक्रारदार वकिलांकडून 50 रुपयांची लाच घेणाऱ्या येथील जिल्हा न्यायालयातील अभिलेख कक्षातील कनिष्ठ लिपिक नरेंद्र सूर्यवंशी (वय 46) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

तक्रारदार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकील आहेत. भाच्याच्या लग्नासाठी न्यायालयाने आरोपीला तात्पुरता जामीन नामंजूर केला होता. त्यासाठी तात्पुरता जामीन अर्ज दाखल करण्यासाठी नामंजूर किंवा फेटाळलेल्या जामीन अर्जाची व आदेशाची प्रमाणित प्रत मिळण्यासाठी तक्रारदार वकिलांनी येथील जिल्हा न्यायालयातील अभिलेख कक्षात कनिष्ठ लिपिक नरेंद्र सूर्यवंशीकडे अर्ज दिला होता. नकला मिळण्यासाठी नियमानुसार 49 रुपयांचे शासकीय शुल्कही भरले होते. या वेळी सूर्यवंशीने तक्रारदारांना "जीएन' पावती देऊन प्रमाणित नकला तयार करून देण्यासाठी दोनशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार वकिलांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या पथकाने सापळा रचून आज दुपारी सूर्यवंशीला 50 रुपयांची लाच घेताना पकडले.

Web Title: court clark arrested in bribe