न्यायाधीशांच्या बनवल्या बनावट ऑर्डर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

जळगाव : जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात असणाऱ्या संशयिताच्या कुटुंबीयांना संपर्क करून जामीन मिळवून देण्याचे आमिष देत एक लाख 35 हजारात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे संशयिताने जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या आदेशाच्या बनावटप्रतीच्या आधारे गंडा घातला असून गुन्हे शाखेने न्यायालयाच्या बनावट आदेशाच्या सही शिक्‍क्‍याच्या प्रती जप्त केल्या आहेत. चंद्रकांत गणपत सुरळकर (वय-29, रा. टॉवर चौक) या भामट्याला गुन्हेशाखेने अटक केली आहे. 

महम्मद हुसेन महम्मद नाजिम (वय-24, रा. तवकलपुर प्रतापगड उत्तरप्रदेश) या ट्रक चालकाचा खून करून मृतदेह फेकून देण्यात आला होता. मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात विशालसिंग अमरनाथसिंग राजपूत (वय-24, रा.बिहट्टा पलथी उत्तर प्रदेश) याला गुन्हेशाखेने अटक केली होती. तेव्हापासून विशालसिंग जिल्हा कारागृहात आहे. त्याला जामिनावर मुक्तता करण्याचे आमिष देत विशालसिंगचा भाऊ सौरभ राजपूत याचा मोबाईल नंबर मिळवून जामीन मिळवून देण्याचे आश्‍वासन देत 1 लाख 35 हजारांमध्ये लूबाडण्यात आल्याचा प्रकार घडला. तीन वेळा पैसे देऊनही जामीन होत नसल्याने सौरभ राजपूत याने जळगाव गाठले. भाऊ विशालसिंग याच्यावर गुन्हा दाखल असलेल्या पोलिस ठाण्यात संपर्क केल्यावर फसवणूक झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने स्थानिक गुन्हेशाखेला संपर्क केला. निरीक्षक बापू रोहोम यांच्या पथकातील उपनिरीक्षक सुधाकर लहारे, अशोक महाजन, रवींद्र पाटील,अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, दीपक पाटील, दादाभाऊ पाटील यांनी सापळा रचून उर्वरित पैसे घेण्यासाठी चंद्रकांत गणपत सुरळकर (वय 36) याला बोलावून घेत ताब्यात घेतले. 

अशी केली फसवणूक 
चंद्रकांत गणपत सुरळकर हा स्वतः खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. तीन महिन्यापूर्वीच तो बाहेर आला आहे. त्याच्या सोबत कारागृहात असलेल्या संशयितांच्या कुटुंबीयांचे नंबर मिळवून त्यांना संपर्क करत होता. जामिनाची खात्री पटवून दिल्यावर खात्यावर पैसे टाकण्यास सांगत होता. विशालसिंग राजपूत याचा भाऊ सौरभला फोन करून मी, देशपांडे वकिलांचा असिस्टंट बोलतोय, अशी ओळख देऊन दोन वेळेस 50 हजार, नंतर 30 हजार अशी रक्कम दिली आहे. 

न्यायालयाचा बनावट आदेश जप्त 
पोलिसांनी अटक केलेला चंद्रकांत सुरळकर हा टॉवर चौकातील लॉजवर खोली करून वास्तव्यास होता. त्याच्याजवळ जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंदा सानप यांच्या बनावट आदेशाच्या प्रती सापडल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या असून त्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: court dublicate order murder case