न्यायालयाच्या आवारात वेड्याचा पोलिसाला चावा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नाशिक - मुका असलेल्या 20 वर्षांच्या तरुणाला जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार ठाण्याच्या वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात आणण्यात आले असता त्याने न्यायालयाच्या आवारातच पोलिस कर्मचाऱ्याच्या दंडाला चावा घेत जखमी केले. त्यामुळे न्यायालयाचे आदेश येईपर्यंत त्याच्याभोवती सरकारवाडा पोलिस ठाण्यातून अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला. 

गेल्या वर्षी जुलैमध्ये सरकारवाडा पोलिसांनी शहर परिसरातील एका 20 वर्षीय मुक्‍या तरुणाला पेठ रोडवरील मिशनऱ्यांच्या अनाथ बालकांच्या सुधारगृहात दाखल केले होते. या तरुणाचे नाव, गाव काहीही माहीत नसल्याने त्याच्या नातलगांचा शोध घेण्याचाही प्रयत्न पोलिसांनी केला होता. दरम्यान, मिशनरी संस्थेने त्याचे संगोपन करण्याची जबाबदारीही घेतली. मात्र, काही दिवसांपासून त्याने संस्थेतील अन्य मुलांना चावा घेण्याचे सत्रच सुरू केले. यात काही मुलांना गंभीर जखमाही झाल्या. त्यामुळे चार दिवसांपूर्वी संस्थेने सरकारवाडा पोलिसांना याबाबत कळवून युवकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यास सांगितले. त्याप्रमाणे पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तीन-चार दिवसांत उपचार व देखरेख केली असता जिल्हा रुग्णालयाने तरुण वेडा असल्याचा अहवाल पोलिसांना दिला. त्यामुळे त्यास रुग्णालयात ठेवणे धोकादायक असल्याने पोलिसांनी त्यास ठाण्याच्या वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाकडे परवानगी मागितली. त्यासाठी आज दुपारी तरुणाला घेऊन पोलिस जिल्हा न्यायालयात दाखल झाले. त्या वेळी न्यायालयीन कामकाज करणारे सरकारवाडा पोलिस ठाण्याचे एक पोलिस कर्मचारी त्याच्याजवळ जाऊन उभे असताना त्याने अचानक त्यांच्या दंडाला जबर चावा घेतला. यामुळे त्यांच्या दंडाला गंभीर जखम झाली. त्यामुळे सरकारवाडा पोलिसांत कळवून जादा कर्मचारी मागविण्यात आले. सायंकाळी न्यायाधीश एस. एन. बुक्के यांचा आदेश येईपर्यंत त्याच्याभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. 

Web Title: Court premises mad cop bite