नाशिक - गाईंचा महिलेवर हल्ला, युवकांनी वाचवला जीव

राजेंद्र बच्छाव
गुरुवार, 19 एप्रिल 2018

इंदिरानगर (नाशिक) : आज (ता.19) सकाळी साडेसात वाजता मॉर्निंगवॉक साठी जाणाऱ्या शोभा शरद जोशी यांच्यावर मोकाट गायींनी केलेल्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून परिसरातील सहा युवकांनी जीव धोक्यात घालून त्यांची सुटका केल्याने त्यांचा जीव वाचल्याची थरारक घटना आज इंदिरानगर भागात घडली.

इंदिरानगर (नाशिक) : आज (ता.19) सकाळी साडेसात वाजता मॉर्निंगवॉक साठी जाणाऱ्या शोभा शरद जोशी यांच्यावर मोकाट गायींनी केलेल्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून परिसरातील सहा युवकांनी जीव धोक्यात घालून त्यांची सुटका केल्याने त्यांचा जीव वाचल्याची थरारक घटना आज इंदिरानगर भागात घडली.

नेहमीप्रमाणे सकाळी पाटील गार्डऩ येथे राहणाऱ्या जोशी, मर्चंट बॅंकेसमोर असलेल्या निरंजन सोसायटी मार्गे वडाळा-पाथर्डी रस्त्याकडे फिरायला जात असताना येथे उभ्या असलेल्या पाच ते सहा गायी अचानक उधळल्या आणि त्यांनी थेट जोशींवर हल्ला केला. त्यांना अक्षरशः उचलून रस्त्यावर फेकले. जीवाच्या अकांताने त्या आोरडू लागल्याने येथे राहणारे सुधीर पाऊल, प्रवीण खरात, अजय खरात, कल्पेश सोणवने, राहुल विंचूरकर आणि वैभव पाटील हातात मिळेल ते घेऊऩ धावले. दगड, काठी आणि जोराने आवाज करून ते गायींना हटवण्याचा प्रयत्न करत होते. परंतू गायी फिरून जोशी यांच्यावर हल्ला करत होत्या. अजय आणि प्रवीण खरात हे भाऊ आणि त्यांचे मजूरी करणारे वडील आप्पा खरात यांच्यासह सुधीर पौळ यांनी जीव वाचवला. 

एका गायीने याच दरम्यान त्यांचा उजव्या हाताचा कोपरा शिंग खुपसल्याने फाडला होता. तर डोक्याला देखील खाली आदळल्याने मोठी जखम केली होती. या युवकांवर देखील गायी धाउन जात होत्या. याच वेळी एका गायीने जोशींचा काखेत शिंग घातले मात्र ऐनवेळी दुसऱ्या बाजूने आलेल्या युवकांनी त्या गायीला जोरात धक्का दिल्याने जोशी यांच्या बरगडीत शिरणाऱ्या शिंगापासून बचाव झाला आणि त्यांचा जीव वाचला.

गायी पांगवल्यानंतर या युवकांनी अंगातील बनियान काढून हातातून वाहणारे रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. सुमारे पंधरा मिनीटे हा थरार सुरू होता. दरम्यान राहुल विंचूरकर यांनी तातडीने स्थानिक नगरसेविका डॉ.दिपाली कुलकर्णी आणि इंदिरानगर पोलीसांना याबाबत माहीती दीली. डॉ.कुलकर्णी यांनी महापालीकेच्या संबंधित विभागाला माहिती  दिली. उपनिरीक्षक रोहीत शिंदे देखील पोचले.

ताताडीने जोशी यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली त्या कमालीच्या दशहतीखाली आहेत. आरोग्य विभागाचे डॉ. प्रमोद सोनावणे यांच्याकडे कुलकर्णी यांनी कलानगर येथे राहणारे या गायींचे मालक चव्हाण यांच्या विरूध्द तक्रार केली असून त्यांना नोटीस देणार असल्याचे डॉ. सोणवने यांनी सांगितले आहे. 

Web Title: cow attacks on one lady in nashik