घशात अडकले खेकड्याचे हाड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नाशिक : गिरणारे येथील 22 वर्षीय युवतीच्या घशात जेवताना खेकड्याचे हाड अडकले असता, तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आली. सुशिला भगवान भोये (22, रा. गिरणारे, ता. जि. नाशिक) असे रुग्ण युवतीचे नाव आहे. 
सुशिला भोये हिने सोमवारी (ता.20) दुपारी राहत्या घरी जेवण करीत असताना खेडक्‍याची भाजी खाल्ली होती. त्यावेळी खेकड्याचा ठणक असे कवच तिच्या घशामध्ये अडकले होते. 

त्यामुळे तिला त्रास होऊ लागला असता, दुपारी चार वाजेच्या सुमारास तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयात तिच्या घशाचा एक्‍स-रे काढण्यात आला असता, ठणक असा पदार्थाचा तुकडा घशाच्या वरच्या बाजुला अडकला होता. त्याची पाहणी जिल्हा रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. संजय गांगुर्डे यांनी पाहणी केली. तिच्यावर आज (ता.21) सकाळी शस्त्रक्रिया विभागात उपचार करण्यात आले. यावेळी तिला भूलतज्ज्ञामार्फत भूल न देताच तिच्या घशात अडकलेला तो ठणक कवचाचा तुकडा काढण्यात आला. यावेळी डॉ. गांगुर्डे यांच्यासह डॉ. शेळके आणि शस्त्रक्रिया विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Crab bone Stuck in the throat