भरधाव ट्रकची रिक्षाला धडक; तीन ठार चार जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

रिक्षात चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर पद्मालय हॉस्पिटल जवळ झाला.

एरंडोल - भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच परिवारातील आई, वडील व मुलगी हे तिघ जागीच ठार झाले. तर रिक्षात चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर पद्मालय हॉस्पिटल जवळ झाला.

जळगाव येथून शेख कुटुंबीय रिक्षा क्र. एम. एच.19 व्ही 7356 ने कासोदा येथे मुलगी पाहण्यासाठी जात होते. एरंडोल पासून केवळ एक किलो मिटर असलेल्या पद्मालय हॉस्पिटल जवळ समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रिक्षाला समोरुन धडक दिल्यामुळे रिक्षातील शेख गायसोद्दीन शेख अलौद्दीन (45), परवीन बी गायसोद्दीन (40) व तमन्ना बी गायसोद्दीन (9) हे तिघे जण जागीच ठार झाले. तर रिक्षातील अन्य चार जण गंभीर जखमी झाले असुन त्यांना जळगाव येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात मयत झालेले सर्व एकाच परिवारातील असुन जळगाव येथील हुडको परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.

Web Title: crash in the truck and auto rickshaw at jalgaon road