बढे पतसंस्थेच्या कर्जदारांवर फौजदारी गुन्हे 

बढे पतसंस्थेच्या कर्जदारांवर फौजदारी गुन्हे 

जळगाव - राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या वरणगाव (ता. भुसावळ) येथील सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेच्या 21 कर्जदारांनी विनातारण कर्ज घेतले, त्याची परतफेड केली नाही, यामुळे त्यांच्यावर आज 19 कोटी 92 लाखांच्या कर्जवसुलीचा फौजदारी गुन्हा सहकार कायद्यान्वये वरणगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय सहनिबंधक एम. डी. पाटील, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, विशेष लेखा परीक्षक ए. जे. पाटील, प्रकाश सुर्वे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

आज दुपारी वरणगाव पोलिस ठाण्यात या गुन्हाची नोंद करण्यात आली. बढे पतसंस्थेच्या 211 कर्जदारांनी विनातारण कर्ज घेतले आहे. ते 71 कोटींचे आहे. 22 शाखांमधील हे कर्जदार आहेत. विनातारण कर्ज घेणे, त्याची परतफेड न करणे, खोटी कागदपत्रे सादर करून कर्ज घेणे, या प्रकरणात हा गुन्हा दाखल आहे. सहकार आयुक्तांनी अशा कर्जवसुलीबाबत 1 जून 2012ला अध्यादेश काढला आहे. त्या आदेशाने व डिसेंबर 2016मध्ये जळगाव येथे ठरविण्यात आलेल्या कर्जवसुलीसाठीच्या ऍक्‍शन प्लॅननुसार हा गुन्हा दाखल झाला. वरणगाव पोलिस ठाण्यात या कर्जदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआय दिलीप गांगुर्डे तपास करीत आहे. 

कर्जदार व कर्ज असे 
रवींद्रसिंग चाहेल (वरणगाव)-3,99,474 
गजानन प्रभाकर वंजारी (वरणगाव)-11,60,223 
सुभाष काशिनाथ माळी (वरणगाव)-6,93,153 
अनिल लक्ष्मण चौधरी (बढे वाडा वरणगाव)-93,49,676 
प्रमोदकुमार बन्सीलाल संचेती (संचेती गल्ली, मलकापूर)-15,29,742 
राजकुमार दयाराम सिंधी (भुसावळ)-24, 82, 785 
अनिल झोपे (बढे वाडा, वरणगाव)-3, 29,888 
नरेंद्र सुपडू मोरे (तपतकठोरा)-24,96,363 
अफजलशॉ रोशन शा (खिडकीवाडा वरणगाव)-49,97,841 
सादीरशा रोशनशा (वरणगाव)-9,55,251 
गोविंद ज्ञानेश्‍वर मांडवगणे (विठ्ठल मंदिर, वरणगाव)-49,53,968 
रामराव तुकाराम पाटील (शांताई बंगला, नाशिक)-13,05,90,000 
सौ.नयना किरण खडके (धनकवाडी पुणे)--50,00,001 
सुशील पदमाकर पारकर (शामल इंटरप्राईजेस, विठ्ठलपेठ जळगाव)-49,99,140 
बोधराम मंहतो (जिल्हापेठ जळगाव)--33,26,570 
खेमराम तुलसी मंहतो (पुणे)--33,26,708 
अभय श्रीनिवास काटे (बांद्रा, जि.ठाणे)-49,84,540 
अमित राजाभाऊ पाटील (पुणे)--44,12,816 
मकरंद उमाकांत ढाके (भुसावळ)-60,00000 
कुंदन दत्तात्रय ढाके (पुणे)--24,99,549 
भुपेश जयंत औरंगाबादकर (पुणे)-57,98,222 
एकूण--19,92,85,910 

इतरांवर दोन महिन्यांत गुन्हे 
पतसंस्थेत इतर 104 कर्जदार असे आहेत ज्यांनी विनातारण कर्ज घेऊन फेडलेले नाही. त्यांनी येत्या दोन महिन्यांत कर्ज न भरल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय सहनिबंधक पाटील यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com