
Dhule Crime News : हॉर्न वाजविण्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग
Dhule Crime News : हळदीच्या समारंभात हॉर्न वाजवू नका, असे सांगितल्याच्या रागातून चौघांना मारहाण केली. तसेच महिलेचा विनयभंग केला. १ मेस रात्री अकराला ही घटना घडली. (Crime against 4 people for beating person and molesting woman dhule crime news)
मोहरद (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील चाळीस वर्षीय महिलेच्या फिर्यादीनुसार तिच्या भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी ते बिलाडी (धुळे) येथे आले. हळदीचा समारंभ सुरू असताना मुकेश कौतिक मोरे, भरत विठ्ठल मोरे, विक्की मोरे, कैलास मोरे हे वाहनाने (एमएच १८, एजे ९५१६) जवळील मार्गावरून जात होते.
समारंभाला आलेले पाहुणे रस्त्यावर असल्याने चालकाने हॉर्न वाजविला. त्याला दुसऱ्या गल्लीतून वाहन ने, हॉर्न वाजवू नको, असे सांगितले. त्याचा राग येऊन या संशयित चौघांनी मुरलीधर साहेबराव पाटील, गोकुळ साहेबराव पाटील, विजय मुरलीधर पाटील, मनीष गोकुळ पाटील यांना मारहाण केली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
भांडण सोडविण्यासाठी नातेवाइकांसह मध्यस्थी करण्यास गेले असता मुकेश कैलास मोरे, भरत विठ्ठल मोरे यांनी महिला नातेवाइकांविषयी अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे वाद विकोपाला गेला. यात मुकेश मोरे व भरत मोरे यांनी पीडितेचा विनयभंग केला. तसेच झटापटीत गळ्यातील मंगळसूत्र तुटून गहाळ झाले.
तेथून निघताना संशयितांनी पोलिसांकडे तक्रार केल्यास ठार करण्याची धमकी दिली. मुकेश मोरे याच्या फिर्यादीनुसार मुरलीधर पाटील, गोकुळ पाटील, विजय पाटील, मनीष पाटील यांनी मुकेश मोरे यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच वाहनाचे नुकसान केले. या प्रकरणी बिलाडी (ता. धुळे) येथील चौघांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.