Dhule Crime News : विवाहितेच्या छळाचा पाच जणांविरोधात गुन्हा

married women harrased by laws
married women harrased by laws esakal

चिमठाणे (जि. धुळे) : चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील माहेर असलेल्या विवाहितेचा घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात शारीरिक आणि मानसिक छळाचा सोमवारी (ता. २७) गुन्हा दाखल करण्यात आला. (Crime against 5 people for harassing married woman dhule news)

चिमठाणे येथील माहेर असलेल्या सीमा राजेश मोरे (वय ३२) यांचा विवाह २०१७ मध्ये धुळे येथे राजेश बापूराव मोरे (रा. बहादरपूर, ता. पारोळा, जि जळगाव) याच्याशी झाला. लग्नात व साखरपुड्यात आई-वडिलांनी बराच खर्च केला होता. सोन्याचे दागिने स्त्रीधन म्हणून दिले होते.

पती राजेश मोरे घाटकोपर येथे नोकरी करतो. लग्नानंतर सासरच्या लोकांनी एक महिन्यापर्यंत चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती राजेश, सासू सुरेखा बापूराव मोरे, सासरे बापूराव पुंडलिक मोरे, नणंद रूपमती शत्रुघ्न ढोले व नंदोई शत्रुघ्न दशरथ ढोले (सर्व रा. बर्वेनगर, भाटवाडी, घाटकोपर) यांनी वेळोवेळी टोमणे मारून लग्नात हुंडा कमी दिला, तसेच मानपान दिला नाही. तू वांझोटी आहेस, असे बोलून चारित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

married women harrased by laws
Ramzan Festival : रमजान पर्वात मालेगावला खवय्यांची चंगळ! पूर्व भागातील उपहारगृहांवर लागले पडदे

घर खरेदीसाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली. पैसे आणले नाहीत म्हणून वेळोवेळी मारहाण केली व घराबाहेर हाकलून दिले. आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सासरच्या लोकांची मागणी पूर्ण करू शकले नाही. शिंदखेडा पोलिस ठाण्यात सीमा मोरे यांनी सोमवारी फिर्याद दिल्यावरून पती, सासू, सासरे, नणंद व नंदोई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक प्रशांत पवार तपास करीत आहेत.

married women harrased by laws
NCP News : बाजार समित्यांसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू; बडे नेते येणार नाशिक दौऱ्यावर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com