Nandurbar News : पालिकेच्या अतिक्रमण कामात आणला अडथळा; पोलिसांत 6 जणांविरुद्ध गुन्हा

crime news
crime newssakal

Nandurbar News : शहरातील करण चौफुलीजवळील पालिकेचे सुशोभीकरण कामातील बांधकाम काढून रस्ता मोकळा करण्याच्या कामात अडथळा आणला. तसेच, पालिकेतील मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन आरडाओरड करीत व्यत्यय आणल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime against 6 people in police for obstructing encroachment work of municipality nandurbar news)

शहरात पालिकेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अनावश्‍यक अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी सुरु केलेल्या मोहिमेचे शहरवासीयांकडून स्वागत करण्यात येत आहे. तर दुसरीकडे काहीजण विरोधही करीत आहेत.

शुक्रवारी (ता. ५) दिवसभरात पुलकित सिंह यांनी धुळे चौफुली, नवापूर-साक्री चौफुली व करण चौफुलीवरील पालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधलेले सुशोभीकरणाचे मॉडेल असणाऱ्या या चौकांचा रहदारीस अडथळा ठरणारा काही भाग काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी स्वतः हज राहून ते काम सुरू केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

crime news
Success Story : कष्ट, जिद्दीने मिळवला परिस्थितीवर विजय; पोलिस दलात निवड...!

मात्र करण चौफुलीजवळ काही नागरिकांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांजवळ अरेरावी केली. तेवढ्यावर न थांबता थेट पालिकेत मुख्याधिकारी सिंह यांच्या दालनात येऊन आरडाओरड केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले.

शुक्रवारी रात्री उशिरा शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पालिकेचे अभियंता गणेश गावित यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दीपक सत्यवान बागले, विश्‍वजित ऊर्फ बॉबी संजय बैसाणे, आकाश रवींद्र अहिरे, गोविंद सामुद्रे, श्री. गोडसे, पावबा आखाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news
Nashik District Bank : गावा गावात झळकणार बड्या थकबाकीदारांचे फलक; वसुलीसाठी विशेष धडक मोहीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com