पत्नीला पैशांसाठी मारहाण करणाऱ्या उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

नाशिक - प्रेमिकेशी विवाह करण्यासाठी आणि नाशिक रोडमधील फ्लॅट, कार नावावर करून घेण्यासाठी व वेतनाचे पैसे देत नसल्याच्या कारणावरून पोलिस उपनिरीक्षक असलेल्या पतीने परिचारिका असलेल्या पत्नीस बेदम मारहाण करून घरातून बाहेर काढले. संशयित उपनिरीक्षक पुंडलिक पावसे याच्याविरोधात नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्हा रुग्णालयात परिचारिका असलेल्या विवाहिता रोहिणी पुंडलिक पावसे (वय 32, रा. पार्थप्रभा अपार्टमेंट, जेल रोड, सध्या रा. प्रीतिसुगंध अपार्टमेंट, बोराडे मळा, जेल रोड) यांच्या फिर्यादीनुसार 2012 मध्ये पुंडलिक धोंडिराम पावसे (रा. करंजगाव, ता. निफाड) याच्याशी विवाह झाला. पावसे उपनिरीक्षक असून, सध्या नगर येथे नियुक्तीला आहे. विवाहानंतर काही दिवसांतच पावसे व सासू-सासरे यांनी संपूर्ण पगाराची मागणी केली. तसेच, पतीचे औरंगाबादच्या महिलेशी संबंध असून, तिच्याशी विवाहासाठी त्याने आपल्याकडे फारकतीची मागणी केली. जेल रोड येथील फ्लॅट व कार नावावर करून देण्याची पती व सासरचे सातत्याने मागणी करीत असून, 22 फेब्रुवारीला मारहाण करून घराबाहेर काढले. तेव्हापासून मी माहेरी राहत आहे. या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: Crime against the inspector who beat his wife for money