आश्रमशाळा शिक्षकांचे वेतन रखडल्यास कारवाई होणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

नाशिक - अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांचे मार्च आणि एप्रिलचे वेतन रखडले असून, शिक्षकांचे वेतन यापुढे 1 तारखेस अदा झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरण्याचे आदेश आदिवासी विकास आयुक्तांनी दिले आहेत.

अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांचे वेतन 1 तारखेस खात्यावर जमा करण्याचे निवेदन स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेत्तर संघटनेच्या वतीने आदिवासी विकास आयुक्तांना देण्यात आले. राज्यातील पाचशेहून अधिक अनुदानित आश्रमशाळा शिक्षकांना दोन महिन्यांचे वेतन मिळाले नसून, दर महिन्याच्या 15 तारखेनंतर वेतन होत आहे. त्यामुळे गृहकर्जाचे हप्ते थकले असून, आर्थिक नुकसान होत आहे, असे म्हणणे आयुक्तांसमोर मांडण्यात आले.

अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे परिपूर्ण आणि अचूक देयके 15 तारखेच्या आत पाठविण्यात विलंब झाल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, तसेच विहित कालावधीमध्ये देयके प्राप्त होऊनही वेतन 1 तारखेस अदा झाले नाही, तर संबंधित अधिकाऱ्याची चौकशी केली जाईल, असे आदिवासी आयुक्तांनी संघटनेला स्पष्ट केले.

Web Title: crime on ashramshala teacher salary stop