प्रातःकाळी पोलिस ठाण्याची वारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

धुळे - जे नागरिक उघड्यावर शौचास जातात त्यांना समज देऊनही सुधारणा होत नसल्याने महापालिकेने अशा नागरिकांना आज पोलिस ठाण्यातच जमा केले. संबंधितांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला व पुन्हा असे वर्तन न करण्याची ताकीदही दिली. पोलिसांना सोबत घेऊन महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.

स्वच्छता अभियानांतर्गत ग्रामीण भागासह नागरी भाग हागणदारीमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही काही जण उघड्यावर शौचास जात असल्याने समस्या कायम आहेत. उघड्यावर जाण्याचे प्रकार थांबत नसल्याने महापालिकेने धडक कारवाई करत संबंधितांना उचलून नेत पोलिस ठाण्याची वारी घडविली.

२५ जणांवर कारवाई
स्वच्छता विभागाच्या पथकांनी मोगलाई भागातील जगदीशनगर, फायर स्टेशनजवळील नदीकिनारी, मोठा पूल, मोहाडी, रेल्वे रुळालगत, ऐंशी फुटी रस्ता आदी ठिकाणी सकाळीच पथकांनी पोलिसांना सोबत घेत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. काही जणांना मोटारसायकलने, तर काही जणांना पोलिसांच्या वाहनातूनच पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

गुन्हा दाखल, ताकीदही दिली
उघड्यावर शौचास बसणाऱ्या संबंधितांवर मुंबई पोलिस ॲक्‍ट कलम ११२, ११७ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना पुन्हा असे वर्तन न करण्याची सक्त ताकीदही देण्यात आली. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे, सहाय्यक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी, स्वच्छता निरीक्षक संदीप मोरे, राजेश वसावे, सुरेश महाजन, लक्ष्मण पाटील, साईनाथ वाघ आदींच्या पथकांनी ही कारवाई केली.

यांच्यावर आली नामुष्की
शिवा परदेशी, संतोष भावसार, वासुदेव माळी, सय्यद चाँद सय्यद नासीर, जावेद अन्सारी, शब्बीर शाकीर शेख, सय्यद अब्बास सय्यद इब्राहिम, शकील बेग मुसीम यांच्यासह २५ जणांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले होते. महापालिकेने थेट पोलिस ठाण्यातच नेल्याने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना चपराक बसली आहे.

Web Title: crime in dhule