निवडणुकीचे काम नाकारल्याने चार शिक्षकांविरूध्द गुन्हा दाखल

दीपक कच्छवा
गुरुवार, 12 जुलै 2018

मेहुणबारे (जळगाव) : मतदान केंद्र अधिकारी म्हणून काम करण्यास नकार देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर तहसिलदारांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करण्यास इच्छुक नसलेल्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बीएलओ) असलेल्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.त्यामुळे नविन शिक्षकांना निवडणूक आयोगाच्या पदावर मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चाळीसगाव भाग व चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ यांच्याकडील आदेशानुसार  नेमणूक होणार आहे.

उबरखेडे( ता.चाळीसगाव) येथील तलाठी रविंद्र नन्नवरे यांनी उंबरखेडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक उर्दू शाळेत जावुन तेथील शिक्षक मोहम्मद हाफीज मोहम्मद हानीज यांनी याबाबतचा आदेश स्वीकारला नाही.त्यामुळे निवडणुक कामी कर्तव्यास कसुर केला म्हणून उंबरखेडे येथील एक तर खेडगाव (ता.चाळीसगाव) येथील शिक्षक संजय साळुंखे व भागवत हाडपे या तिघांच्या  विरोधात तहसिलदार कैलास देवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातही एका शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यात चार शिक्षकांवर कारवाई झाल्याने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: crime filed against 4 teachers for rejecting election duty