कोपरगावात तुरुंग फोडण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

कोपरगाव - शहरातील दुय्यम कारागृहातील बराक क्रमांक तीनमधील शौचालयाचे भांडे; तसेच जेवणाचे स्टीलचे ताट वाकवून, नेलकटर व तारेच्या साहाय्याने भिंत फोडून पळून जाण्याचा प्रयत्न १७ आरोपींनी आज पहाटे केला. त्यात कोळपेवाडी दरोडा, खून व इतर गुन्ह्यांतील आरोपींचा समावेश 
आहे. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

दरम्यान, सहायक फौजदार बाबासाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून १७ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. 

दुय्यम कारागृहातील बराक क्रमांक तीनमधून आज पहाटे भिंत खरडल्याचा आवाज येत होता. सहायक फौजदार बाबासाहेब शिंदे व इतर तीन अंमलदारांना संशय आल्याने त्यांनी १७ आरोपींना बाहेर काढले. पूर्ण बराकीची तपासणी केली असता, वाकवून धारदार केलेले स्टीलचे ताट, पांढऱ्या धातूची तार, तुटलेले नेलकटर असे साहित्य सापडले. बाजूला मातीचा ढिगारा व शौचालयाच्या भांड्याचे तुकडे पडलेले दिसले. 

आरोपींनी संगनमताने भांडे व भिंतीचा भाग फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Crime Jail