esakal | चावी बनवण्याचा बहाण्याने आला आणि लाॅकरवर डल्ला मारून गेला !
sakal

बोलून बातमी शोधा

चावी बनवण्याचा बहाण्याने आला आणि लाॅकरवर डल्ला मारून गेला !

चावी बनवण्याचा बहाण्याने आला आणि लाॅकरवर डल्ला मारून गेला !

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नंदुरबार ः खांडबारा (ता. नवापूर) गावात लॉकरची चावी बनवितांना केलेल्या दीड लाखाची चोरीतील भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मध्य प्रदेशातील खरगोन येथून जेरबंद केले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

खांडबारा येथील कुसुमबाई जगताप यांच्या घरी कपाटाच्या लॉकरची चावी बनवण्याचा बहाण्याने लॉकरमधील दीड लाख रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत १६ फेब्रुवारीला विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास सुरू होता.गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांचा मार्गदर्शनाखाली विनोद जाधव , राकेश वसावे , राजेंद्र काटके , विकास अजगे , अभय राजपुत यांचे पथकाने सीसीटीव्हींमधील फुटेज पाहुन संशयित ललकारसिंग जलसिंग शिकलीकर (रा. एकता नगर , नंदुरबार) हा असल्याचे निष्पन्न झाले होते . तो पोलीसांना गुंगारा देत मध्यप्रदेशात पलायन केले होते . तेव्हापासुन पथक त्याचे मागावर होते . अखेर तो खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा गावात असल्याची बातमी मिळाल्याने पथक वेषांतर करुन सापळा रचुन त्याला जेरबंद केले . नंदुरबार येथे आणुन विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने खांडबारा गावात केलेल्या चोरीची कबुली दिली . त्यामुळे आरोपीस पुढील तपासकामी विसरवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

घरफोडीतील आरोपी अटक

नंदुरबार शहरातील राजसारथी नगरात झालेल्या घरफोडीचे गुन्ह्याची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन उकल झाली असून दोघांकडून चोरीचे टीव्हीसह 10 हजारात मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.

राजसारथी नगरात राहणारे किशोर जयदेव पाटील यांचेकडे घरफोडी होऊन ३२ इंची टीव्हीसह नऊ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरी झाला होता . त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना सुचना केल्या होत्या . त्यानुसार गुन्हे अन्वेषण शाखेचे राकेश मोरे , सुनिल पाडवी, दादाभाई मासुळ , पोकॉ अभय राजपुत , आनंदा मराठे यांचे पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सक्रीय केले व त्यासाठी गुप्त बातमीदार नेमले . या पथकाने किरण दगा ठाकरे (रा . पातोंडा) राज नारायण थनवार (रा . मेहतर वस्ती) यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता दोघांनी गुन्हा मान्य करुन गुन्ह्यात चोरलेला ७ हजार रुपये किमतीचा एक ३२ इंची एलएडी टीव्ही तसेच ७ हजार १०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने काढुन दिले. दोन्ही आरोपींना अटक करुन पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे