जामनेर टोळीतील संशयितास पुणे दरोडा प्रकरणात अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

पुण्यातील हिंजेवाडी परिसरात पेट्रोलपंपावर धिंगाणा घालून दरोडा टाकण्याचा प्रयत्न 22 जूनला रात्री साडेनऊच्या सुमारास झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांत दाखल गुन्ह्यातील फरार संशयितास औद्योगिक वसाहत पोलिसांनी आज पहाटे चारच्या सुमारास गावठी कट्टा आणि 5 जिवंत काडतुसांसह अटक केली.

जळगाव - पुण्यातील हिंजेवाडी परिसरात पेट्रोलपंपावर धिंगाणा घालून दरोडा टाकण्याचा प्रयत्न 22 जूनला रात्री साडेनऊच्या सुमारास झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांत दाखल गुन्ह्यातील फरार संशयितास औद्योगिक वसाहत पोलिसांनी आज पहाटे चारच्या सुमारास गावठी कट्टा आणि 5 जिवंत काडतुसांसह अटक केली.

पुण्यातील आयटीनगर मारुंजी रस्त्यावरील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या जामनेर (जळगाव) येथील सराईत टोळीच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या होत्या. शुभम मणिलाल जैन (वय 21, रा. गिरिजा कॉलनी, जामनेर, प्रकाश किशोर मोरे (वय 27, रा. गणेशवाडी, जामनेर, विशाल अरुण वाघ (वय 22, रा. महुखेडा, जामनेर) आणि प्रतीक शिवाजी बारी (वय 20, रा. आयटीआय कॉलनी, जामनेर) यांना अटक करण्यात आली होती. यातील प्रशांत पाटील, रामेश्वर राठोड (दोन्ही रा. जामनेर) हे दोघे दुचाकीवरून फरार झाले होते. त्यांच्यापैकी एक रामेश्वर राठोड हा जळगाव शहरात लपल्याची माहिती पुणे एमआयडीसी पोलिसांना दिली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime in Robbery case