चित्तथरारक पाठलागानंतर पिस्तुलासह दोघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016

जळगाव - उपविभागीय पोलिस अधिकारी, औद्योगिक वसाहत ठाण्याच्या निरीक्षकांच्या पथकाने रात्रभर पाळत ठेवत चित्तथरारक पाठलाग करत वावडदा (ता. जळगाव) येथे पिस्तूलधारी दोघा संशयितांना जेरबंद केले.

घरफोडी, दरोडा अथवा गावठी कट्टे विक्रीच्या इराद्याने हे संशयित फिरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. दोघा संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. 
उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे आणि औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुराडे, रात्री मेहरुण बंदोबस्ताची पाहणी करीत असताना पिस्तूलधारी संशयितांची माहिती सांगळेंना मिळाली.

पोलिस नाईक रामकृष्ण पाटील, रत्नाकर झांबरे, नितीन बाविस्कर, संदीप पाटील यांच्या पथकासह शशिकांत पाटील, किशोर पाटील, हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे यांची दुसरी टीम संशयितांच्या मागावर होती. त्यांच्या माहितीवरुन सांगळे यांनी जळगाव- पाचोरा मार्गावर पोलिस जीप आडवी लावून जळगावकडून पाचोऱ्याकडे सुसाट वेगात जाणारी हिरोहोंडा मोटरसायकल (एमएच १९ एडी ६६०९) अडवण्यात आली. वाहन सोडून दोघांनी अंधाराचा फायदा घेत शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांचा चित्तथरारक पाठलाग करुन, दोघांना जळके शिवारात पोलिसांनी पकडण्यात यश आले. 

अंगझडती घेतल्यानंतर एकाच्या कंबरेला सिल्वर रंगाचे गावठी बनावटीचे लोडेड पिस्तूल मिळून आले. त्यांची चौकशी केल्यावर अनिल पूनमचंद राठोड (वय-२८), आकाश अरुण सोनार (वय-२५, दोघे रा. तुळजाईनगर रायपूर) या दोघांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणल्यावर जप्त मुद्देमाल ताब्यात घेत पोलिस कर्मचारी गजानन कोळी याने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपरीक्षक नाना सूर्यवंशी करीत आहे. अनिल पूनमचंद राठोड, आकाश सोनार दोघांना जिल्हा न्यायालयात हजर केल्यावर न्या. डी.बी.गोरे यांच्या न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत रवाना करण्याचे आदेश दिले.

Web Title: criminal arrested by police