नोटा छपाई करणाऱ्यास अद्यापही अटक नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

नाशिक - सुमारे सव्वा कोटीच्या बनावट नोटांप्रकरणी अटक करण्यात आलेला राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी छबू नागरे याच्यासह 11 संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या (ता. 2) संपत असल्याने त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, अद्यापही बाराव्या संशयिताला अटक करण्यात अपयश आले आहे. नोटांच्या तपासणीचा अहवालही पोलिसांना प्राप्त झालेला नाही.

आडगाव पोलिसांनी एक कोटी 35 लाख किमतीच्या बनावट नोटांप्रकरणी छबू नागरे, रामराव पाटील-चौधरी, डॉ. प्रभाकर घरटे यांच्यासह 11 संशयितांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या (ता. 2) संपत आहे. या टोळीतील आणखी एक संशयित कृष्णा अग्रवाल या नोटा छपाईचे काम करणाऱ्याला अटक करण्याचे आव्हान आहे. नागरेसह 11 संशयितांची बॅंक खाती गोठविण्यात आली आहेत. परंतु, यामध्ये बनावट नोटांचा वापर करून किती रुपये चलनात आणण्याचा प्रयत्न झाला; याची माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. छापलेल्या बनावट नोटा तपासणीसाठी नाशिक रोडच्या चलार्थ पत्र मुद्रणालयाकडे पाठविल्या आहेत. त्याचा अहवालही अद्याप मिळालेला नाही.

Web Title: Criminals of note priting not arrested yet