पोलिस ठाण्यात "सैराट' जोडप्यांनी आणली गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

भावाचा संयम सुटला 
हात-पाय जोडले विनवण्या केल्या, रक्तदाब वाढून आई रुग्णालयात दाखल असल्याचे सांगून येत नाही म्हटल्यावर "आईला काही झाले तर.. दोघांना जगू देणार नाही' असे म्हणत मुलीच्या भावाने पोलिस ठाण्यातच धमकावले. पोलिसांनी त्याला दम देत बाहेर काढले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोघांचा जबाब घेत पोलिसांनी रवाना केले. 

जळगाव - एकाचवेळी दोन जोडपी प्रेमविवाह करून रामानंदनगर पोलिस ठाण्यात धडकली. मुलीच्या कुटुंबीयांकडून भीती असल्याचे सांगत दोघा जोडप्यांनी कागदपत्र देत संरक्षण मागितल्याने पालकांना कळविण्यात आले. एका मुलीच्या आईला या प्रकाराने जबर धक्का बसून ती भोवळ येऊन पडली. तर दुसऱ्या मुलीच्या वडिलांचा रक्तदाब (बीपी) वाढल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ठाण्यात जमाव जमून तणाव निर्माण झाला. पण, दोन्ही प्रकरणात मुलींचे हातपाय जोडले तरी त्या येण्यास तयार नाही म्हणून जमलेल्या जमावाने काढता पाय घेतला. 

शहरातील वाटिकाश्रम परिसरातील मोना (बदललेले नाव) या तरुणीने नांदेड (ता. धरणगाव) येथील तरुणासोबत नोंदणी पद्धतीने विवाह उरकला. पिंप्राळ्यातील पिंकीने (बदललेले नाव) सोबत शिक्षण घेणाऱ्या तरुणाशी वर्षापूर्वीच लग्न लावून घेतले होते. दिवस उजाडताच एकामागून एक अशी दोन स्वतंत्र प्रकरणे रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली. वाटिकाश्रम येथील मोनाच्या कुटुंबीयांना माहिती या प्रकाराची माहिती मिळाल्यावर तिच्या नातेवाइकांनी पोलिस ठाणे गाठले. "वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे.. घरी चल' असे सांगितल्यावर तिने "मला यायचे नाही' असे म्हणत नकार दिला. मात्र, पिंप्राळा येथील पिंकीच्या कुटुंबीयांना घटना कळाल्यावर पिंप्राळा येथील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिला पोलिस ठाण्यात धडकल्या. थोड्या वेळाने मुलीचा भाऊ आणि मावशी पोलिस ठाण्यात येऊन विनवण्या करू लागले.. "आईची तब्येत बिघडलीय, ती मरून जाईल तिच्यासाठी तरी चल..' असे म्हणत दोघांनी हातपाय जोडल्यानंतरही मुलगी येण्यास तयार नाही म्हणून गोंधळ उडाल्याने पोलिसांनी गर्दी पांगवली. 

भावाचा संयम सुटला 
हात-पाय जोडले विनवण्या केल्या, रक्तदाब वाढून आई रुग्णालयात दाखल असल्याचे सांगून येत नाही म्हटल्यावर "आईला काही झाले तर.. दोघांना जगू देणार नाही' असे म्हणत मुलीच्या भावाने पोलिस ठाण्यातच धमकावले. पोलिसांनी त्याला दम देत बाहेर काढले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोघांचा जबाब घेत पोलिसांनी रवाना केले. 

Web Title: crowd in police station

टॅग्स