सिआरपीएफ जवानाचा मृतदेह आश्वासनानंतर कुटुंबियांकडून ताब्यात

संतोष विंचू
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

येवला - मानोरी (ता.येवला) येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) रविवारी पहाटे शहीद झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिगंबर यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. मात्र कुटुंबियांनी दिगंबर असे करूच शकत नसून हा घातपात असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. यामुळे आज सोमवारी येथे आलेले पार्थिव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेले आहे. मात्र सीआरपीएफ कमांडटंनी आश्वासन  दिल्यानंतर कुटुंबियांनी मृत देह ताब्यात घेतल्याने वाद शमला. ग्रामस्थांनी रास्ता रोको करत आंदोलन छेडले होते.

आसाम मधील तेजपुर येथे रविवारी पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान ते शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.हे वृत्त गावात समजताच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.त्यांच्या पश्चात पत्नी,१ मुलगा,१ मुलगी असा परिवार आहे.
दिगंम्बर यांची तेथील अधिकाऱ्यांनी स्टोर किपर म्हणून नुकतीच नेमणूक केलेली होती. मात्र या स्टोरच्या हिशोबाबाबत गोंधळ असल्याने २०१४ पासून चौकशी सुरू होती. याबाबत शनिवारी रात्री दिगंम्बर त्यांच्या मेव्हण्यांशी याविषयी बोलले होते.वार्षिक तपासणी सुरू असल्याने या हिशोबाचे काळजी दिगंम्बर यांनी बोलून दाखवली होती.पण ते रिलॅक्स मुड मध्ये होते.

हे बोलणे झाल्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांनी गोळी झाडून घेतल्याचा निरोप आल्याने सगळेच सुन्न झाले. नक्कीच या घटनेत घातपाताचा संशय असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी थेट गृहमंत्री,मुख्यमंत्री व संबधीतांना पत्र पाठवून या प्रकाराची चौकशी करण्याची व दिगंम्बर यांना शहीद घोषित करण्याची मागणी केली आहे.

तसेच मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे.संपूर्ण गाव देखील कुटुंबासोबत असल्याने येथे आज सकाळी तणावाचे वातवरण होते.
दरम्यान,गुवाहाटी येथून आज सकाळी मृतदेह येथे पोहोचला आहे.मात्र,ग्रामस्थ व नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा पाहता पोलिसांनी तालुका पोलीस ठाण्यात मृतदेह ठेवला आहे.नातेवाईक व ग्रामस्थांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: CRPF Jawan Suicide Murder Deathbody Family