मनमाड : जिवंत अर्भकाला बेवारस फेकून दिल्याचा निर्दयी प्रकार उघडकीस

cruelty to throw a living infant incident happened at Manmad
cruelty to throw a living infant incident happened at Manmad

मनमाड : आईनेच आपल्या पाच दिवसांच्या पोटच्या जिवंत अर्भकाला बेवारस फेकून दिल्याचा निर्दयी प्रकार आज समोर आल्याने 'माता न तूं वैरिणी' होत आईपणाला काळीमा फासली. मनमाड येवला रोडवरील अनकाई बारी रस्त्याच्याकडेला कपड्यात गुंडाळलेले पुरुष जातीचं अर्भक रडत असल्याचा आवाज आल्याने रस्त्याने जाणाऱ्या दोघांनी पोलिसांना बोलावून गोंडस बाळ त्यांच्या स्वाधीन केले. उपचारासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता अर्भकाची प्रकृती ठणठणीत असून त्याच्या आई-वडिलांचा शोध पोलीस घेत आहे. 

'स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी' असे म्हणत आईच्या महतीची थोरवी गायली जाते. तर काही वेळा असेही एखादे कृत्य आईच्या हातून घडते की 'माता न तूं वैरीणी' हे म्हणण्याची वेळ येते. अंकाई बारीत अर्भक फेकल्याचा निर्दयी प्रकार घडला आहे. अंकाई गावात राहणारे होमगार्ड धर्मा दामले व संजय गांगुर्डे हे दोघे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंगवॉक करत असताना त्यांना मनमाड - येवला रस्त्याच्याकडेला एका झाडाखाली बाळाच्या रडण्याचा आवाज आला. इतक्या सकाळी कोणी बाळ ठेवले, या विचारात या दोघांनी आवाजाच्या दिशेने जात पाहिले तर कपड्यात गुंडाळलेले एक गोंडस बाळ रडत असल्याचे आढळून आले. दोघांनी आसपास पाहिले. परंतु कोणाचाही पत्ता नव्हता. त्यामुळे कोणीतरी या नवजात जन्मलेल्या अर्भकाला बेवारस फेकून दिले असल्याची दोघांची खात्री झाल्यानंतर त्यांनी तातडीने हा प्रकार सहायक पोलीस निरीक्षक आर पी गलांडे यांना सांगितला.

काही क्षणात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अर्भकाला घेऊन पोलिसांनी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. पोद्दार यांनी अर्भकाची तपासणी केली असता हे अर्भक केवळ 4 ते 5 दिवसाचे असल्याचे निष्पन्न झाले. बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगताच श्री गलांडे, होमगार्ड दामले व गांगुर्डे यांना समाधान वाटले ज्या ठिकाणी या बाळाला टाकण्यात आले. तो भाग वनविभागाचा आहे. घनदाट झाडी असल्याने जंगली श्वापदांचा वावर असतो. बाळाचे नशीब चांगले की, वेळीच देवदूत म्हणून दामले व गांगुर्डे हे धावून आले आणि अर्भकाचा जीव वाचला नाही. तर या अर्भकाला श्वापदांचा मोठा धोका निर्माण झाला असता अनैतिक संबधातून हे बालक जन्मला आल्याने त्यास निर्जनस्थळी फेकून दिले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून बाळाची नाशिकच्या बालसुधारगृहात रवानगी केली आहे. तर बालकाच्या पालकाचा शोध पोलीस घेत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com