जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांचे संस्कृती दर्शन

दिगंबर पाटोळे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

वणी (नाशिक) : येथे जागतिक आदिवासी गौरव दिना निमीत्त महाराष्ट्र आदीवासी बचाव समीती व विविध आदिवासी संघटनाच्यावतीने भव्य शोभायात्रा व विविध कार्यक्रमांनी जागतीक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

वणी (नाशिक) : येथे जागतिक आदिवासी गौरव दिना निमीत्त महाराष्ट्र आदीवासी बचाव समीती व विविध आदिवासी संघटनाच्यावतीने भव्य शोभायात्रा व विविध कार्यक्रमांनी जागतीक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

येथील कळवण - सापुतारा त्रिफुलीवर वीर बिरसा मुंडा चौकातील विद्युत दिपास जागतिक आदिवासी दिना निमित्त आकर्षक तोरणमाळा, फुलमाळा व पांढरे लाल फुग्यांनी सजविण्यात आले होते. यानंतर ग्रामपंचायत सदस्य तथा भगतबाबा दगु भरसट यांच्या हस्ते निसर्ग देवतेचे दान पुजन करण्यात आले. यानंतर वीर बिरसा मुंडाच्या प्रतिमेचे पुजन करुन आदिवासी ध्वजाचे ध्वजारोहन आदिवासी बचाव अभियानाचे अध्यक्ष प्राचार्य अशोक बागूल यांनी करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर गावातून भव्य संस्कृती दर्शक शोभायात्रा काढली. शोभायात्रेतील पारंपारीक आदिवासी वाद्य, नृत्य, लोककला, क्रांतीवीर बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, राघोजी भांगरे, एकलव्य, तंट्या भिल्ल, खाजा नाईक आदींच्या वेशभुषेतील तरुन तरुनी सहभागी झाले होते. यात आदिवासींची लोकजीवनावर आधारीत सजिव देखाव्याचे सादरीकरणाने वणीकरांचे लक्ष वेधुन घेतले. सदर रॅली दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बौध्द बांधव, मस्जिद चौकात मुस्लीम बांधव, मराठा संघटना व विविध संस्था व संघटनांनी शोभायात्रेचे स्वागत केले. शोभायात्रेत आमदार नरहरी झिरवाळ यांनी पांरपारीक रावनाचा मुखवटा नृत्य, तसेच व्यासपिठावर पावरी वाजवत केलेले नृत्य सर्वाचे लक्ष वेधून घेतले. 

दरम्यान यश लॉन्स येथे आयोजीत सहविचार सभेत बोलतांना दिंडोरी पेठ विधान सभेचे आमदार- नरहरी झिरवाळ यांनी आदिवासींचा इतिहासाची परिपूर्ण माहिती संकलित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगुण या व्यासपिठावर विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करण्यास संधी मिळण्याची सुचना केली. आदिवासी बचाव अभीयानाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष- प्रा. अशोक बागुल यांनी जागतिक आदिवासी दिनाची माहिती देत, संविधानातील अनुसुची ५ व ६ लागू व्हावी यासाठी देशाचे मुळ निवासी असलेल्या सर्व बांधवांनी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यक्रमाचे आयोजन समितीचे तथा आदिवासी बचाव अभियानाचे तालुकाध्यक्ष अमोल गावित यांनी केले. यावेळी विविध जिल्हा परीषद शाळांतील विद्यार्थ्यांनी आदिवासी वेशभुषेत नृत्य सादर करीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. यावेळी कवी रमेश भोये, जिल्हा परीषद सदस्या छायाताई गोतरणे, पंचायत समिती सदस्या विजया बर्डे, रविकुमार सोनवणे, किरण गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त करीत दरवर्षी ९ ऑगष्ट रोजी जागतिक आदिवासी दिना निमीत्त शासकीय सुटी जाहीर करण्याची मागणी केली. तर कवी रमेश भोये यांनी कविता सादर केल्या तर सरोज भोये यांनी आदिवासी बोली भाषेतून मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात विचार मंचावर एकही मान्यवरास बसण्याची व्यवस्था न करता सर्वांनी खाली बसुन एकात्मतेचे दर्शन घडवले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन - बबीता सुर्यवंशी तर आभार संदीप जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदिवासी बचाव अभियान, आदिवासी पंच कमीटी, आदिवासी ग्रामसेवक संघटना, शिक्षक संघटना, कर्मचारी, विद्यार्थी संघटना आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Culture exhibition of tribal brothers on the occasion of World Tribal Day