esakal | धुळे जिल्ह्यात ५ जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू !
sakal

बोलून बातमी शोधा

night carfew

राज्य शासनाकडून लॉकडाउन कालावधीत लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत वेळोवेळी दिलेले निर्देश, अपवाद पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

धुळे जिल्ह्यात ५ जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू !

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी येथील महापालिका क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत, तर जिल्ह्यातील सर्व पालिका व नगर परिषद क्षेत्रात ३१ डिसेंबरला रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत पूर्णतः संचारबंदी (कर्फ्यू) घोषित केली आहे. 

आवश्य वाचा-  खेळता खेळता अचानक बालक गायब झाला; आणि समोर आली भयंकर घटना


राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १४ मार्चच्या आदेशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १३ मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू आहे. धुळे जिल्ह्यात लॉकडाउनचा कालावधी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागू आहे. तसेच राज्य शासनाच्या २१ डिसेंबरच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील धुळे महापालिका क्षेत्रात २२ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ पर्यंत तसेच धुळे शहर महापालिका, सर्व पालिका, सर्व नगर परिषद क्षेत्रात ३१ डिसेंबर २०२० ला रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत पूर्णतः संचारबंदी घोषित केली. 

उल्लंघन केल्यास कारवाई 
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील. तसेच राज्य शासनाकडून लॉकडाउन कालावधीत लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत वेळोवेळी दिलेले निर्देश, अपवाद पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती कायद्यानुसार शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी यादव यांनी स्पष्ट केले. 
 

आवर्जून वाचा-  संकट कितीही असो पोलिसांचे मनोधैर्य, मनोबल उंचावलेलेच ! 

पूर्वानुभव पाहता दक्षता 
जगासह देशात, राज्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर धुळे जिल्ह्यातही कोरोना विषाणूने शिरकाव केला. धुळ्यात १० एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर जिल्हाभरात कोरोना विषाणूने पाय रोवले. ते आजपर्यंत कायम आहेत. मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा प्रभाव कमी झाला. धुळे जिल्ह्यातही आरोग्य विभाग, महापालिका व एकूण जिल्हा प्रशासनाच्या परिश्रमाने कोरोनाला नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र, धोका कायम असल्याने व ब्रिटनध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्याने केंद्र, राज्य सरकार दक्ष झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. खबरदारी म्हणून धुळे जिल्ह्यातही जिल्हाधिकारी यादव यांनी रात्रीची संचारबंदी घोषित केली आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती 
-एकूण बाधित : १४,३७१ 
-एकूण मृत्यू : ३८६ (आजअखेर) 
-धुळे मनपा क्षेत्रातील मृत्यू : १७२ 
-उर्वरित जिल्ह्यातील मृत्यू : २१४ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top