'ब्रेक दि चेन' अंतर्गत नंदूरबार जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश

दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असेल. अपवादात्मक सेवांना सकाळी ७ ते रात्री ८ दरम्यान सूट देण्यात आली.
'ब्रेक दि चेन' अंतर्गत नंदूरबार जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश

नंदुरबार : जिल्ह्यात ब्रेक दि चेन अंतर्गत जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. शनिवार व रविवार असे दोन दिवसाची जनता कर्फ्यु कायम ठेवत पूर्णत: संचारबंदी राहणार असून या कालावधित वैद्यकीय सुविधा, औषध दुकाने, पाणी, विद्युत, दूध, गॅस वितरक, वृत्तपत्र सेवेला मुभा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.

कोणत्याही नागरिकास योग्य कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास प्रतिबंध असेल. आदेशात सूट देण्यात आलेल्या आस्थापनांशिवाय इतर आस्थापना बंद रहातील. शनिवार व रविवार वगळता इतर दिवशी किराणा, भाजीपाला, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यान्न दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असेल. अपवादात्मक सेवांना सकाळी ७ ते रात्री ८ दरम्यान सूट देण्यात आली असून त्यासंबंधी हालचाली व सेवा सुरू ठेवण्यास नमूद कालावधीत प्रतिबंध असणार नाही. या सेवांमध्ये कार्यरत चालक, घरेलू कामगार यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक राहील.

सुरू असलेल्या सेवा

- रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषध कंपन्या, इतर

-वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात उत्पादन आणि वितरणसंबंधी आस्थापना असतील म्हणजे वितरक,

-वाहतूकदार, पुरवठा साखळीतले लोक. लशींचे उत्पादन आणि वितरण, सँनेटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे,

इतर पूरक उत्पादने आणि सेवा.

- पाळीव प्राण्यांसाठीची खाद्यदुकाने, प्राण्यांसंबंधी सेवा, प्राण्यांचे निवारागृह आदी.

- किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरीज, बेकऱ्या, सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने.

- शीतगृहे आणि वखार सेवाविषयक आस्थापना.

- सार्वजनिक वाहतूक- हवाई सेवा, रेल्वेसेवा, टँक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसगाड्या.

- स्थानिक प्रशासनांच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती कामे.

- स्थानिक प्राधिकारणाच्या सर्व सार्वजनिक सेवा.

- ऱिझर्व्ह बँक आणि त्यांच्याकडून आवश्यक ठरविल्या गेलेल्या सर्व सेवा.

- सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी संबंधित ठरवलेल्या स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिटरी,

क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स आणि सेबीशी संबंधीत कामे.

- दूरसंचार सेवांशी संबंधित सेवा, देखभाल दुरुस्ती.

- मालवाहतूक.

- पाणीपुरवठा विषयक सर्व कामे, सेवा.

- शेतीशी संबंधित सर्व कामे आणि शेती निरंतरपणे होऊ शकेल यासाठीची सर्व कामे य़ात बीबियाणे, खते,

उपकरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीची कामे आणि दुरुस्ती हे सर्व समाविष्ट आहे.

- आयात निर्यात विषयक सर्व व्यवहार.

- जीवनावश्यक वस्तूविषयक ई-कॉमर्स.

- अधिस्वीकृतीप्राप्त माध्यमकर्मी.

- पेट्रोल पंप आणि पेट्रोलसंबंधी उत्पादने विषयक सेवा.

- सर्व प्रकारच्या कार्गो सेवा

- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या क्लाऊड सेवा, डेटा सेंटर्स आणि पायाभूत सुविधांसाठीच्या

महत्त्वाच्या माहिती-तंत्रज्ञानविषयक सेवा.

- सरकारी आणि खासगी सुरक्षारक्षक सेवा.

- विद्युत तसेच गॅसपुरवठा सेवा.

- एटीएम आणि तत्संबंधीच्या सेवा.

- टपालसेवा.

- लस तसेच इतर जीवरक्षक औषधे आणि औषधी उत्पादकांचे कस्टम हाऊस एजंट तसेच परवानाधारक

मल्टिमोडल वाहतूकदार.

- कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे कच्चे माल किंवा वेष्टनसामुग्री बनवणारे कारखाने.

वर उल्लेखलेल्या सेवांसंदर्भात अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी खालील सर्वसाधारण तत्वांची

अंमलबजावणी करावी.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com