भुजबळ होमपिचवर कधी येणार याचीच उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

येवला - येवला म्हणजे भुजबळ यांचे होमपीच...या दुष्काळी मतदारसंघाला नवा आकार देण्याचं काम छगन यांनी केले आहे. त्यामुळे जशी भुजबळांची येवल्याची तशीच येवल्याच्या जनतेचीही भुजबळांशी नाळ जोडली गेली असून, याच अस्मितेतून येवलेकरांना आपला नेता आपल्या होमपीचवर कधी येणार याची उत्सुकता लागली आहे.

येवला - येवला म्हणजे भुजबळ यांचे होमपीच...या दुष्काळी मतदारसंघाला नवा आकार देण्याचं काम छगन यांनी केले आहे. त्यामुळे जशी भुजबळांची येवल्याची तशीच येवल्याच्या जनतेचीही भुजबळांशी नाळ जोडली गेली असून, याच अस्मितेतून येवलेकरांना आपला नेता आपल्या होमपीचवर कधी येणार याची उत्सुकता लागली आहे.

१७ जानेवारी २०१६ या दिवशी भुजबळ येवल्यात तब्बल आठ तास तळ ठोकून होते. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीसह समस्या जाणून घेतल्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर महिनाभर ते परदेशात फिरण्यासाठी गेले होते. तेथून आल्यावर चौकशीचा ससेमीरा त्याच्यामागे लागला आणि ते आपल्या लाडक्या मतदारसंघाकडे फिरकलेच नाही. १७ जानेवारी हाच येवल्यातील त्यांचा येण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानतर १६ मार्च रोजी अटक झाल्यानंतर त्यांची तुरुंगातून अधिकृतपणे रविवारी (ता.६) सुटका झाली आहे. असे असले तरी त्यांची प्रकृती खालावलेली असल्याने ते रुग्णालयातच उपचार घेत असून, अजून घरीदेखील गेलेले नाही.
 भुजबळ जामिनावर सुटल्यानंतर तब्बल २८ महिन्यापासून आपल्या मतदारसंघात आले नाहीत. त्यामुळे ते केव्हा येतील याची उत्सुकता येवलेकरांना आहे. तशी ती भुजबळांना देखील असल्याचे आज सोमवारी (ता.७) समोर आले आहे.

येथील युवा नेते सुनील पैठणकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगरसूलचे माजी सरपंच सुभाष निकम, अनिल निकम आदींनी आज जेव्हा केईएम रुग्णालयात भेट घेतली तेव्हा भुजबळांनी मला केव्हा येवल्याला येईल असं झालं असल्याचे भावनिक उद्गार काढले. त्यामुळे तब्बेतीची सुधारणा होऊन न्यायालयाकडून रितसर परवानगी मिळताच भुजबळ मतदारसंघाच्या भेटीला येतील हे नक्की आहे..

तसे तर वयाच्या पंचात्तरीतही भुजबळांनी आपले मतदार संघावर तसुभरही प्रेम कमी होऊ दिले नाही. मागील दहा वर्षांत राज्याचे महत्त्वाचे मंत्री असतांना देखील आठवड्यातून एकदा अथवा महिन्यातून दोन-तीन वेळेस तरी भुजबळ आपल्या मतदारसंघाच्या भेटीला यायचे. रविवार तर त्यांचा भेटीचा निश्चित वार असायचा. मागील २८ महिन्यात भुजबळांना जेव्हा-जेव्हा तारखेच्या वेळी न्यायालयात आणले जायचे, त्यावेळी येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व नेते देखील न चुकता त्यांना भेटण्यासाठी जात होते. यावरूनच भुजबळांचे व येवल्याचे नाते किती घट्ट आहे हे स्पष्ट होते.

Web Title: The curiosity that when Bhujbal will ever come home