सिक्‍युरिटी डिझाईनच्या विलंबामुळे नोटाछपाई ठप्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

नाशिक - देशभर नोटाटंचाईचे प्रकरण तापले असताना पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांच्या छपाईला केंद्र सरकारच्या पातळीवरच विलंब झाल्याचे उघडकीस आले. पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांच्या डिझाईनमधील "सिक्‍युरिटी फीचर'च्या बदलाच्या मंजुरीअभावी देशातील नोटाछपाई प्रेसना मिळण्यात विलंब वाढत चालला आहे.

छपाई बंदमुळे दोन हजाराच्या नोटांची साठेबाजी सुरू असल्याचा संशय आहे.

देशात देवास आणि नाशिकलाच पाचशे रुपयांच्या नोटाछपाईची प्रमुख जबाबदारी आहे. यंदा 10450 दशलश नोटा छपाईचे उद्दिष्ट आहे. नोटाछपाईची मोठी गरज भागविणाऱ्या वित्त मंत्रालयाच्या चलार्थपत्र मुद्रणालयाला यंदा 450 दशलक्षांनी उद्दिष्ट वाढवून मिळाले. त्यात 200 रुपये वगळता उर्वरित 1 रुपया, 10, 20, 50, 100 आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या छपाईचे काम वाढले.

नोटाटंचाईची प्रमुख कारणे
-2 हजाराच्या नोटांची छपाई बंद
-एटीएम कॅलिब्रेशनची संथ प्रक्रिया
-डिझाईन मंजुरीची प्रक्रिया दिरंगाईची
-छपाईत नव्हे, तर वितरणात दोष

Web Title: currency printing stop by security design