पुन्हा नोटाटंचाईने नागरिक त्रस्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

नाशिक - एटीएममध्ये नोटांच्या खडखडाटाने नाशिककर पुन्हा त्रस्त झाले आहेत. जेमतेम पन्नास कोटींच्या आसपास रोकड राहिल्याने स्टेट बॅंकेसह विविध बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेकडे साडेतीनशे कोटींची मागणी केली आहे. 

नाशिक - एटीएममध्ये नोटांच्या खडखडाटाने नाशिककर पुन्हा त्रस्त झाले आहेत. जेमतेम पन्नास कोटींच्या आसपास रोकड राहिल्याने स्टेट बॅंकेसह विविध बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेकडे साडेतीनशे कोटींची मागणी केली आहे. 

नाशिक जिल्ह्यात एप्रिलमध्ये पुन्हा एकदा नोटांची मागणी वाढली आहे. 930 पैकी सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक एटीएममध्ये नोटांचा तुटवडा आहे. बॅंकांकडे पन्नास कोटींच्या आसपास रोकड शिल्लक राहिली आहे. दैनंदिन कामकाजासह सुट्यांच्या काळात एटीएम मशिनमध्ये भरण्यासाठी निधीची सोय करताना त्रेधातिरपीट सुरू आहे. रिझर्व्ह बॅंकेकडे मागणी नोंदवूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे बॅंकांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वरिष्ठ स्तरावर देशभरात सगळीकडे थोड्याअधिक फरकाने अशीच स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांची वाढत्या नोटांची मागणी पूर्ण करताना बॅंकांची कसरत सुरू आहे. 

गेल्या सहा-सात दिवसांपासून ही परिस्थिती उद्‌भवली असून, बॅंकांना एटीएमवर चकरा मारण्याची वेळ आली. नोटाबंदीनंतर नागरिकांनी तब्बल तीन महिने त्रास सहन केला होता; परंतु आता ऐन उन्हाळ्यात एटीएमवर फिरताना नागरिक घामाघूम होत आहेत. नाशिकला आठवडाभरासाठी किमान साडेतीनशे कोटींची गरज भासते. ती रिझर्व्ह बॅंकेकडून पूर्ण झाली नाही, तर येत्या एक-दोन दिवसांत बॅंकांमध्ये गर्दी उसळण्याची शक्‍यता आहे.

Web Title: currency shortage in nashik