PHOTOS : दादा भुसेंना कॅबिनेट मंत्रीपदी बढती...मालेगाव तालुक्याची मंत्रीपदाची परंपरा कायम!

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेल्या माजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळतानाच बढती झाली. सन २००४ मध्ये सर्वप्रथम अपक्ष विजयी झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्विकारुन गेली वीस वर्षापासून पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले. पक्षनिष्ठेचे फळ व युतीच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामामुळे त्यांना सलग दुसऱ्यांदा संधी मिळाली. विजयी चौकारपाठोपाठ मंत्रीपद षटकार ठरला आहे.

नाशिक : मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेल्या माजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळतानाच बढती झाली. सन २००४ मध्ये सर्वप्रथम अपक्ष विजयी झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्विकारुन गेली वीस वर्षापासून पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले. पक्षनिष्ठेचे फळ व युतीच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामामुळे त्यांना सलग दुसऱ्यांदा संधी मिळाली. विजयी चौकारपाठोपाठ मंत्रीपद षटकार ठरला आहे. राज्यमंत्रीमंडळ स्थापनेपासून पाच वर्षाचा कार्यकाळ वगळता मालेगाव तालुक्याची मंत्रीपदाची परंपरा यामुळे कायम राहिली आहे.

Image may contain: 4 people, people standing and flower

विजयी चौकारपाठोपाठ मंत्रीपद षटकार
भुसे सिव्हील इंजिनियर आहेत. त्यांची पत्नी अनिता यांचे सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. मुलगा अजिंक्य व अविष्कार युवासेनेच्या कामकाजात सक्रिय आहेत. अविष्कार युवा सेनेचे राज्यसंघटक असून त्यांनी विभागात युवकांचे मोठे संघटन केले. पंधरा वर्षाच्या कार्यकाळात मंत्री भुसे यांनी औद्योगिक वसाहतीसाठी शेती महामंडळाची ८६३ एकर जमिनी मिळवून दिली. गायरान, गावठाण जमिनीवरील घरांचे अतिक्रमण कायम, ग्रामपंचायत इमारतींसाठी निधी, ग्रामीण भागात आरओ पाणीपुरवठा, गिरणा नदीवर पाच तर मोसम नदीवर चार कोल्हापूर बंधारे. जलवाहिनी-जलकुंभांची कामे, सामान्य रुग्णालय, नर्सिंग महाविद्यालय, मोसम नदीवरील नव्या पुलांची निर्मिती. गिरणा नदीवर पुरातन पुलाची दुरुस्ती, १६ कोटी रुपयाचा नवीन पुल, तालुक्यात आठपेक्षा अधिक वीज उपकेंद्र, मुख्य गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरण-मजबुतीकरण, सटाणा-मालेगाव रस्त्याचे रुंदीकरण,  शहर पाणीपुरवठ्याचा तळवाडे साठवण तलाव १०० एकर जमिनीत क्षमतावाढ, सप्तशृंगगड विकासनिधी, देवस्थानांना दर्जा, ई-लर्निंग व डिजीटल शाळा, मालेगाव महोत्सव, हजारो आदिवासी बांधवांनी सामुहिक विवाहातून कन्यादान योजनेचा लाभ. मालेगाव हद्दवाढीतील गावांसाठी विशेष पॅकेजमधून पथदीप, पाणी, रस्ते केले. तालुका पोलिस ठाण्याची इमारत. रमजानपुरा व पवारवाडी पोलिस ठाण्यांची निर्मिती. उपप्रादेशिक परिवहन व पंचायत समितीसाठी अद्ययावत इमारतींची निर्मिती. पोलिस उपअधिक्षक कार्यालय. अमृत, मोसम नदी स्वच्छता निधी, दुष्काळी शेतकऱ्यांना अनुदान, घरकुले अशी शेकडो कामे केली. 

Image may contain: 2 people, people standing and flower

गेल्या चार निवडणुकीत सातत्याने मताधिक्क्यात वाढ 
मंत्री असूनही त्यांनी पदाचा बडेजाव व तोरा मिरविला नाही. सामान्य कार्यकर्त्यांमधील उठ-बस व जनतेच्या प्रत्येक सुख-दु:खात सहभागी होण्याची कार्यपध्दती त्यांच्या विजयात हातभार लावून गेली. गेल्या चार निवडणुकीत सातत्याने त्यांच्या मताधिक्क्यात वाढ झाली. विरोधी पक्षातही त्यांना मानणारे शेकडो कार्यकर्ते आहेत. सर्वपक्षीयांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. नार-पार, औद्योगिक वसाहतीत उद्योग व जिल्हानिर्मिती ही आगामी काळातील त्यांच्या समोरील आव्हाने असतील.

हेही वाचा >"मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते" : फडणवीस 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेनंतर लक्षवेधी आंदोलन

विरोधी पक्षात असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लक्षवेधी आंदोलन केले. वीज वितरणच्या भोंगळ कारभाराविरुध्द आवाज उठविला. पक्ष व स्वखर्चातून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. महागाईविरोधात बैलगाडी मोर्चा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेनंतर लक्षवेधी आंदोलन. ग्रामीण भागातील पाण्यासह विविध प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेतली. त्यांच्या मंत्रीपदामुळे मालेगाव तालुक्यात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

हेही वाचा > गुलाबराव पाटील; पानटपरी चालक ते कॅबिनेट मंत्री 

Image may contain: 5 people, people smiling, people standing

संधीचे सोने करतील..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व तालुक्यातील जनतेचे आर्शिवाद. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , युवानेते आदित्य ठाकरे यांचा विश्वास, आजवर केलेली विकासकामे पक्षनिष्ठा. यामुळे कँबीनेट मंत्रीपदाची संधी मिळाली. त्याचा आनंद तर आहेच. आगामी काळात ते तालुक्यासह राज्यात लक्षणीय विकासकामे व जनसेवा करतील. संधीचे सोने करतील. प्रलंबीत प्रश्न व विकासकामे मार्गी लावतील. -अनिता दादा भुसे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dada Bhuse as cabinet minister Nashik Malegaon Political Marathi News