मथुरेत श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक झाले..अन् ते ही कायमचेच....

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

निवृत्त शिक्षक दगडू आत्माराम कोठावदे (वय 76) हे पत्नी प्रमिला यांच्यासमवेत गुरुवारी (ता.14) देवदर्शनासाठी निघाले. मंगळवारी (ता.19) ते वृंदावन (मथुरा) येथे आले. गडाच्या पायऱ्या चढून श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होताच त्यांच्या छातीत कळ आली आणि क्षणार्धात ते कायमचे तिथेच विसावले. आप्तस्वकीयांनी याची माहिती मंत्रालयात महसूल विभागात कक्ष अधिकारी असलेले उदय कोठावदे व जयवंत कोठावदे यांना दिली. त्यांचे पार्थिव शववाहिकेने कळवण येथे आणले.नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिक : उत्तर आयुष्यात धार्मिकेत रममाण झालेले निवृत्त शिक्षक दगडू कोठावदे मथुरेला गेले असता, गडाच्या पायऱ्या चढल्यानंतर श्रीकृष्णाच्या चरणी कायमचे नतमस्तक झाले. ही घटना मंगळवारी (ता.19) सायंकाळी साडेपाचला घडली. 

Image may contain: 1 person, closeup

मथुरेत श्रीकृष्णाच्या चरणी दगडू कोठावदे कायमचे नतमस्तक 

निवृत्त शिक्षक दगडू आत्माराम कोठावदे (वय 76) हे पत्नी प्रमिला यांच्यासमवेत गुरुवारी (ता.14) देवदर्शनासाठी निघाले. मंगळवारी (ता.19) ते वृंदावन (मथुरा) येथे आले. गडाच्या पायऱ्या चढून श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होताच त्यांच्या छातीत कळ आली आणि क्षणार्धात ते कायमचे तिथेच विसावले. आप्तस्वकीयांनी याची माहिती मंत्रालयात महसूल विभागात कक्ष अधिकारी असलेले उदय कोठावदे व जयवंत कोठावदे यांना दिली. त्यांचे पार्थिव शववाहिकेने कळवण येथे आणले.नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तर असा येतो हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका येण्याआधी वीस मिनिटे हृदयाला हानी पोहोचण्यास सुरुवात होते. चाळीस मिनिटांनंतर ऑक्सिजनचा पुरवठा थांबवल्याने ऊतींचे कार्य मंदावते. चार तासांनतर हृदयाला झालेली हानी भरून काढणे अजिबात शक्य नसते. तर सहा तासांनतर हृदयाचे कार्य पूर्ववत करणे अशक्य होऊन बसते. अशा अवस्थेमध्ये फक्त हतबल होऊन जे होते ते पाहात राहाण्याशिवाय दुसरा उपाय नसतो. या अवस्थेमध्ये पहिल्या अठ्ठेचाळीस तासांत उपचार मिळाले तर जीव वाचण्याच्या शक्यता पन्नास टक्के असतात. शरीरात नेमकी कोणती लक्षणे दिसत आहेत, त्यावर किती जलद उपाय करतो, यावर हृदयविकाराच्या झटक्यातून बचावतो

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dagadu Kothawade,s Death by Heart Attack at mathura Nashik News