Sun, Sept 24, 2023

Rain Damage News : वादळी वाऱ्यामुळे शेतात केळी पिकाचे नुकसान
Published on : 6 June 2023, 11:09 am
Dhule News : तालुक्यातील भडणे येथे रविवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जूनच्या सुरवातीलाच पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. (Damage to banana crop in Bhadane due to sudden storm Dhule News )
वाऱ्यामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केळीचे खांब जमीनदोस्त झाले होते. वीजखांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?