वाड्यांचे चिरे अन्‌ ‘रोज मरे’...!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नाशिक - दर वर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका धोकादायक वाड्यांना नोटिसा पाठविते. पावसाळ्यात काही वाडे कोसळतातही. त्यात काहींचा जीवही जातो. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या उक्तीप्रमाणे रहिवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षीच त्या जुन्या नोटिसांवरील धूळ झटकत नव्याने नोटिसा पाठविल्या जातात. भविष्यातील धोका ओळखून महापालिका प्रशासन व जीर्ण वाड्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांनी सामंजस्याने मध्यम मार्ग काढण्याची आवश्‍यकता आहे. ‘जन्म इथेच अन्‌ मरणही इथेच’ ही भूमिका न सोडल्यास जुन्या नाशिककरांचे भवितव्य कठीण आहे.

नाशिक - दर वर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका धोकादायक वाड्यांना नोटिसा पाठविते. पावसाळ्यात काही वाडे कोसळतातही. त्यात काहींचा जीवही जातो. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या उक्तीप्रमाणे रहिवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षीच त्या जुन्या नोटिसांवरील धूळ झटकत नव्याने नोटिसा पाठविल्या जातात. भविष्यातील धोका ओळखून महापालिका प्रशासन व जीर्ण वाड्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांनी सामंजस्याने मध्यम मार्ग काढण्याची आवश्‍यकता आहे. ‘जन्म इथेच अन्‌ मरणही इथेच’ ही भूमिका न सोडल्यास जुन्या नाशिककरांचे भवितव्य कठीण आहे. जुने नाशिक भागातील तांबट लेनमधील काळेवाडा रविवारी पडून त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने शहरातील जीर्ण व सुस्थितीत असलेल्या वाड्यांचा घेतलेला आढावा.

९० टक्के दावे न्यायालयात
पंचवटी व जुने नाशिक भागात पेशवेकाळापासून वाडे अस्तित्वात आहेत. पिढ्यान्‌पिढ्या कुटुंबे येथे वास्तव्यास असून, कुटुंबाचा विस्तार वाढत असताना कुटुंबप्रमुख मात्र वाड्यांमध्येच राहिले. इतर सदस्य मात्र उपनगरांमध्ये स्थलांतरित झाले. गावठाण भागात व शहराच्या मध्यभागी असल्याने हाकेच्या अंतरावरील बाजारपेठ, फ्लॅट संस्कृती न रुजणे त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे भाडेकरू म्हणून दावा कायम ठेवण्याच्या भूमिकेमुळे वाडे सोडले जात नाहीत. जवळजवळ ९० टक्के वाड्यांचे दावे न्यायालयात आहेत. जागांचे भाव वाढल्याने वाड्यांचा पुनर्विकास करण्याचे प्रयत्न बांधकाम व्यावसायिकांकडून होत आहेत. त्याला राजकारण्यांचे पाठबळदेखील मिळत असल्याने भाडेकरू व मालकांमध्ये तंटे निर्माण झाले तरी वाडेधारक जीव मुठीत धरूनच जगत आहेत.

ढासळणारे वाडे; साडेबारा हजार कुटुंबे धोक्यात
शहरात नऊशेहून अधिक वाडे आहेत. त्यात महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार साडेसातशे वाडे धोकादायक, तर त्यात अतिधोकादायक ३९७ वाडे आहेत. पूर्व विभागात अतिधोकादायक १८८ वाडे आहेत. पंचवटी विभागात ९७, नाशिक रोड विभागात ६४, तर सातपूर विभागात २१ व सिडको विभागात २८ वाडे आहेत. २३ गावठाणे मिळून शहराची निर्मिती झाल्याने मुख्यत्वे वाडे गावठाण भागातच आहेत. एका वाड्यात दहापासून वीस कुटुंबे आहेत. कुटुंबांची संख्या बारा हजारांच्या पुढे असून, सुमारे ७० हजार लोकसंख्या त्यात सामावली आहे.

Web Title: Dangerous wada in nashik