मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला 'भूमिपूत्रा'कडून दुग्धाभिषेक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

मांडवे खुर्द (ता. पारनेर) येथे आज भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून निषेध नोंदविला. लोकांना मोफत दूधवाटप केले. 

टाकळी ढोकेश्वर : मांडवे खुर्द (ता. पारनेर) येथे आज भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून निषेध नोंदविला. लोकांना मोफत दूधवाटप केले. 

वाडेकर म्हणाले, "राज्य सरकारने एक जूनच्या संपावेळी दिलेले दूधदराचे आश्‍वासन पाळले नाही. दुधाच्या दरात वर्षभरात लिटरमागे 10 रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक संघर्ष समितीने तीन ते नऊ मेदरम्यान राज्यस्तरीय मोफत दूधवाटप सप्ताह आंदोलनाचे नियोजन केले आहे. भूमिपुत्र संघटना त्यात सहभागी असून, ठिकठिकाणी आंदोलने करीत आहोत.'' 

यावेळी संघटनेचे संजय भोर, माउली गागरे, बाजीराव गागरे, बाळासाहेब दरेकर, बाळासाहेब जाधव, लहानू गागरे, पांडुरंग जाधव, व्यंकटेश जाधव, विक्रम हारदे, पांडुरंग गागरे आदी उपस्थित होते. 

Web Title: Danghdhishek from Bhaumiputra to CM statue