दारणा 69 टक्के, तर भावलीत 72 टक्के साठा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

गेल्या 24 तासांत 51 मिलिमीटर पाऊस झाला. दारणाच्या पाणलोट क्षेत्रात काल दिवसभर कोरडे वातावरण असले, तरी घाटमाथ्यावरून पाण्याची आवक सुरूच आहे. गेल्या 24 तासांत दारणात 24 दशलक्ष घनफूट, तर भावलीत 9 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली.

इगतपुरी (जि. नाशिक) - तालुक्‍यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली असली, तरी इगतपुरी शहरात मात्र बरसात सुरूच आहे.

गेल्या 24 तासांत 51 मिलिमीटर पाऊस झाला. दारणाच्या पाणलोट क्षेत्रात काल दिवसभर कोरडे वातावरण असले, तरी घाटमाथ्यावरून पाण्याची आवक सुरूच आहे. गेल्या 24 तासांत दारणात 24 दशलक्ष घनफूट, तर भावलीत 9 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली.

दारणामध्ये आता 69 टक्के पाणीसाठा झाला. सात हजार 149 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात चार हजार 867 दलघफू पाणी साठले आहे. या धरणात अद्याप पाणी सोडलेले नाही. तर, भावलीचा साठा 72 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. एक हजार 434 क्षमतेच्या या धरणात एक हजार 026 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.

भंडारदरा 40 टक्के भरले
उत्तरनगर जिल्ह्याची जीवनरेखा समजले जाणारे भंडारदरा धरण 40 टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू आहे. कालपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धबधबे, ओढ्या-नाल्यांचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक मंदावली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darana Dam Water Storage Nature