धामणगाव आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Hanging
Hanging

घोटी : धामणगाव (ता. इगतपुरी) येथील माध्यमिक आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याने शाळेसमोर असलेल्या झाडाला दोर लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

खडकेद येथील दहावीचा विद्यार्थी शरद भाऊ उघडे धामणगाव येथील माध्यमिक निवासी आश्रम शाळेत शिक्षण घेत होता. त्याने पहाटे दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब सहकारी विद्यार्थ्यांना समजताच त्यांनी शाळेतील शिक्षकांच्या लक्षात घटना आणून दिली. त्यांनी घोटी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, शीतल गायकवाड, संतोष दोंदे, लहू सानप यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com