पोलिस ठाण्यातच "दे दणादण' 

पोलिस ठाण्यातच "दे दणादण' 

जळगाव ः न्यायालयातील कामकाज झाल्यानंतर पती व पत्नीत वाद  झाला. त्यानंतर पती शहर पोलिस ठाण्यात आला असता त्याच्यासोबत असलेल्या तरुणाला पत्नीसह तिच्या माहेरच्या मंडळींनी मारहाण केली. त्यात यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत तरुणाला बाजूला केल्याने या कुटुंबीयांनी पोलिसांवरच धक्काबुक्की केल्याचा आरोप करीत गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी विवाहिता व तिचा पती यांच्यासह दोन्ही गटांतील 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

चाळीसगाव येथील रश्‍मी हिचा साडेतीन वर्षांपूर्वी रिंगरोडवरील विशाल उत्तम सोनवणे याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर तीन महिने उलटत नाही तोच पतीसह सासरे, जेठ तुषार सोनवणे यांनी माहेरून दहा लाख रुपये आणण्याच्या मागण्यासाठी छळ केला. या विरोधात रश्‍मी यांनी जिल्हापेठ पोलिसात व यानंतर महिला दक्षता समितीकडे तक्रार केली. महिला दक्षता येथे सुनावणीनंतर चाळीसगाव न्यायालयात याप्रकरणी कामकाज सुरू आहे. तर पती विशाल सोनवणे यांनी रश्‍मीसह तिचे वडील, आई यांच्याकडून शिवीगाळ तसेच मारहाण केल्याबाबत जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. यावर जिल्हा न्यायालयात कामकाज सुरू आहे. 

दंगलीचा गुन्हा 
पतीने तक्रार दाखल केली असल्याने त्यावर शुक्रवारी कामकामासाठी रश्‍मी तिचे वडील, आई, बीएसएफ जवान असलेला भाऊ तसेच बहीण हे जळगाव जिल्हा न्यायालयात आले. याठिकाणी पती विशाल तसेच उत्तम दीपचंद सोनवणे यांना शिवीगाळ झाली. याप्रकरणी विशाल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी रश्‍मी सोनवणे, रमेश चिंतामण जाधव, सुशील रमेश जाधव, रोहित रमेश जाधव, जयश्री रमेश जाधव या पाच जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com