तब्बल चोविस तासानंतर मृतदेह काढला पाण्यातून बाहेर

दीपक कच्छवा
शुक्रवार, 11 मे 2018

कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन आलेल्या ट्रक ड्रायव्हर बापु राठोड (वय 55) यांचा मृतदेह आज दुपारी दोन वाजता बाहेर काढण्यात आला.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - ता.कृष्णापुरी धरणातील पाण्यात बुडालेल्या प्रोढाचा मृतदेह तब्बल चोविस तासानंतर पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. शिरपुर तालुक्यातुन काही पट्टीचे पोहणारे तरून येथे बोलविण्यात आले होते.

कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन आलेल्या ट्रक ड्रायव्हर बापु राठोड (वय 55) यांचा मृतदेह आज दुपारी दोन वाजता बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह तब्बल चोविस तासानंतर पाण्यातून बाहेर काढण्यात आला. प्रशासनाचे पथक देखील या ठीकाणी सकाळी अकरा वाजेपासून तळ ठोकून होते. मृतदेहाचा पंचनामा करण्याचे काम मेहुणबारे पोलिस करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The dead body were taken out of the water after the twenty four hour