वाघळेत आढळला मृत बिबट्या

दीपक खैरनार
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

अंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वाघळे येथील श्रीपुरवडे रस्त्यावरील वाघळे शिवारात शेतकरी दौलत कडू वाघ यांच्या डाळिंब बागेत गुरूवारी (ता.६) रोजी दुपारी तीनच्या सुमारास एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. स्थानिकांनी ही बाब पोलिसांना कळविताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी झाले व त्यांनी पाहणी केली असता बिबट्या मृत अवस्थेत आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दौलत वाघ यांच्या श्रीपुरवडे रस्त्यावरील वाघळे शिवारातील गट क्रमांक ३२२ मध्ये डाळिंबांची लागवड केली आहे. वाघ हे तीनच्या सुमारास डाळिंबाच्या बागेत फेरफटका मारत असताना त्यांना उग्र वास येत होता. त्यानंतर त्यांनी परिसरात पाहिल्यानंतर बांधाजवळ एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. त्यांनी स्थानिक पोलिस पाटील बाबूराव वाघ यांना मोबाईलवरून संपर्क साधला आणि याची माहिती दिली.

जायखेडा पोलिसांच्या मदतीने वनविभाग ताहराबाद परिक्षेत्राचे अधिकारी निलेश कांबळे यांना कळविण्यात आले. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. बिबट्याचा तब्बल तीन ते चार दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने उग्र वास येत होता. पशूअधिकारी डाॅ. के.ए.खंडाळे व डाॅ. एस. सी. कोकणी यांना पाचारण करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणीअंती बिबट्या आठ वर्षे वयाचा असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बिबट्याचे शवविच्छेदन करून जागेवरच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वनपाल डी.जे.सोनवणे, वनरक्षक पी.एस.खैरनार, वनमजूर कैलास पवार, एल.एस.बोरसे, तसेच शेतकरी भिका वाघ, अजय वाघ, प्रमोद वाघ, योगेश वाघ, प्रदिप वाघ, शंशीकात वाघ आदींनी सहकार्य केले.

Web Title: Dead leopards found in Waghale