भैरवनाथाच्या रथाखाली मानकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

वडनेर भैरव (जि. नाशिक) - कालभैरवनाथ यात्रोत्सवाच्या परतीच्या रथ मिरवणुकीत येथील मानकरी भाऊसाहेब लहानू निकम (माळी) यांचा तोल जाऊन रथाच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी घडली.

वडनेर भैरव (जि. नाशिक) - कालभैरवनाथ यात्रोत्सवाच्या परतीच्या रथ मिरवणुकीत येथील मानकरी भाऊसाहेब लहानू निकम (माळी) यांचा तोल जाऊन रथाच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी घडली.

वडनेर भैरव येथे गेल्या दहा दिवसांपासून कालभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू होता. आज सकाळी 10 वाजता परतीची रथ मिरवणूक सुरू झाली होती. दुपारी दीडच्या सुमारास मिरवणूक सावता महाराज चौकात आली. या ठिकाणी रथाच्या धटावर बसण्याचा मान माळी परिवारातील भाऊसाहेब लहानू निकम (माळी) यांना होता. ते धटावर बसले होते. मात्र, मिरवणुकीतील गर्दीमध्ये त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. बैलांना जुंपलेल्या रथाचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. त्यात ते गंभीर झाले. त्यांना वडाळीभोई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी सुलोचना भोये यांनी त्यांना मृत घोषित केले.

Web Title: death by bhairavnath rath