दगडाची ठेच लागून पडल्यामुळे भावीकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

संग्रामपूर (बुलढाणा) : सातपुडा पर्वतामधील महागिरी महादेवावर दर्शनाला जाणाऱ्या भाविकाचा दगडाची ठेच लागून डोक्यावर पडल्याने मृत्यू झाला. ही घटना आज 27 आगस्ट चे दुपारी घडली. या बाबत सोनाळा पोलिस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली आहे. श्रावण महिन्यात सातपुडा पर्वतामधील महागिरी महादेव येथे तिसऱ्या सोमवारी भव्य भडारा असतो.

त्यासाठी दूरवरून भाविकांची गर्दी असते. सोनाळापासून आत निसर्ग रम्य वातावरणात जवळपास 17 किमी अंतरावर ही महागिरी टेकडी पुरातन आहे. आज याच ठिकाणी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी टूनकी येथील दिनकरराव पुडलीक महाले वय 60 वर्ष जात होते. टेकडी चे जवळपास पोहचत असताना रस्त्यात त्यांना दगडाची ठेच लागली आणि ते दगडावर पडले. यात त्याचे डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती आहे. या संदर्भात सोनाळा पोलिसांनी नोंद घेतल्याचे समजते.

Web Title: The death of the Predictive due to stone stumbling