सेवानिवृतीच्या आदल्या दिवशी एकुलत्या एक मुलाच्या निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

खामखेडा (नाशिक) : खामखेडा येथील रहिवासी व सध्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता दिलीप जिभाऊ शेवाळे यांचा मुलगा शशांक शेवाळे (२४) याचे (ता. ३०) अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. दिलीप शेवाळे हे (ता. ३१) आज सेवेतुन निवृत्त होत आहेत. आपल्या निवृत्तीच्या आदल्या दिवशीच आपल्या एकुलत्या एक मुलाचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने कुटुंबीय व खामखेडा गावावर शोककळा पसरली.

शशांक हा पुणे येथून माघील वर्षी एम ई झाला होता.सध्या लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा पास होत अंतिम परीक्षेची घरीच तयारी करत होता. शशांक हा उत्तम मोटारबाईक रेसर होता. उत्तम मोटार रेसर म्हणून नाशिक शहरात त्याची ओळख होती. लेह लद्दाख यांसह अवघड अनवट अश्या स्पर्धांमध्ये त्याने सहभाग नोंदवला होता.

दिलीप शेवाळे यांचा कुटुंबियांच्या सोबत (ता.३१ ) घरघुती निवृत्तीचा कार्यक्रमाची तयारी सुरु होती. मात्र सोमवारी अचानक शशांकला जोराचा खोकला आल्याने त्यास होक्वार्ट हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान मंगळवारी रात्री ११:३० वाजता निधन झाले. शशांक हा अतिशय सोज्वळ मुलगा असल्याने त्याच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबीय व गाववासीयांवर शोककळा पसरली.

खामखेडा येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पाठीमाघे आई मंगल, विवाहित बहिण असुन सटाणा महाविध्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य बी जे शेवाळे, खामखेडा येथील प्रगतीशील शेतकरी दिनकर शेवाळे  व सटाणा नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा सुमनताई शेवाळे यांचा तो पुतण्या होता.

Web Title: the death of a single child on the day before retirement