झोक्‍यात गळफास बसून चिमुकलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

सातपूर परिसरातील शिवाजीनगरमध्ये झोळीत झोपलेली 9 महिन्याच्या चिमुकलीचा गळफास बसून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली. आराध्या योगेश खाडपे (समर्थ रेसीडेन्सी, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर, सातपूर) असे चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक : सातपूर परिसरातील शिवाजीनगरमध्ये झोळीत झोपलेली 9 महिन्याच्या चिमुकलीचा गळफास बसून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली. आराध्या योगेश खाडपे (समर्थ रेसीडेन्सी, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर, सातपूर) असे चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

योगेश खाडपे हे समर्थ रेसीडेन्सी अपार्टमेंटमध्ये फ्लॅट नं.2 मध्ये राहत असून त्यांना 9 महिन्याची आराध्या ही मुलगी आहे. सोमवारी (ता.23) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मनिषा खाडपे यांनी मुलगी आराध्या हिला घरातील झोळीमध्ये झोपण्यासाठी टाकले.

झोळीतून ती खाली पडू नये यासाठी मनिषा खाडपे यांनी झोळीला स्कार्पने बांधले होते. त्यानंतर त्या कामामध्ये गुंतून गेल्या. याच दरम्यान, आराध्या झोळीतून सरकत-सरकत खाली आली असता, झोळीला बांधलेल्या स्कार्प तिच्या गळ्याभोवली अडकला आणि तिला गळफास बसला.

सदरची, बाब आई मनिषा खाडपे यांच्या लक्षात आली तोपर्यंत उशिर झाला होता. योगेश खाडपे यांनी आराध्याला बेशुद्ध अवस्थेमध्ये जिल्हा रुग्णालयात तीन वाजेच्या सुमारास दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सदरच्या घटनेमुळे शिवशक्ती चौक परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. 

Web Title: The death of small baby