प्रवरा नदी पात्रात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू

प्रवरा नदी पात्रात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू

संगमनेर - संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथे दहा वर्ष वयोगटातील तीन शाळकरी मुलांचा प्रवरा नदी पात्रातील वाळूच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. आज सकाळी साडे अकराची नंतर ही घटना घडली.

समर्थ दिपक वाळे (10), रोहित चंद्रकांत वैराळ (11) व वेदांत उर्फ बाळा विनोद वैराळ (9) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी असून, शाळा सुटल्यानंतर ते पोहण्यासाठी गावापासून सुमारे 800 फुटांवर असलेल्या प्रवरा नदीवर गेले होते. वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.

जवळच धुणे धुणाऱ्या एका महिलेने हे दृश्य पाहून आरडाओरडा केला. काही युवकांनी धाव घेतली, मात्र तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, वाळूच्या खड्ड्यामुळे तीन निष्पाप जीवांचा बळी गेल्याची चर्चा सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com